चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील हंडरगुळी हे गाव जसे (लाल कंधारी,देवणी इ.) गुरांच्या जंगी बाजारासाठी भारतातील विविध राज्यात सुप्रसिध्द आहे.तसे येथील महादेव मंदीर ही पंचक्रोशीत सुप्रसिध्द आहे.
कारण,प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी.व अरण्यात असताना श्रीराम हे हंडरगुळीत आले आणि येथील तिरु नदीपाञात जल स्नान केले.तद्नंतर याच नदी मधील वाळूतुन महादेवाची पींड बनवली. आणि त्या पींडीचे दर्शन घेतले.अशी अख्याईका आहे.म्हणुन हे शिवालय हाळी सह पंचक्रोशीतील हजारो स्ञी पुरुष,युवक,युवती अशा भक्तांचे श्रध्दास्थान आहे.तसेच या मंदीरात सालाचे बाराही महिने विविध पुजा, आराधना व धार्मिक कार्यक्रम होतात म्हणुन हे मंदीर विविध अध्यात्मिक उपक्रमांचे केंद्रही आहे.
प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली हंडरगुळी ही गाव.आणि या गावात असलेले विविध देवालये जसे प्रसिध्द आहेत.तसे शिवालय हे पण हाळी,मोरतळवाडी,चिमाचीवाडी, खरबवाडी,नागदरवाडी,रुद्रवाडी, आढळवाडी,वंजरवाडी,राचनावाडी, वडगाव,शेळगाव,टाकळगाव,सुकणी वायगाव,वाढवणा खुर्द,शिवनखेड, कुमठा बू.या उदगीर,अहमदपुर, चाकुर,जळकोट तालुक्यातील गावा गावात सुप्रसिध्द आहे.
तसेच हे नवसाला पावणारे मंदीर म्हणुनही हे मंदीर सर्वदुर सुप्रसिध्द आहे.म्हणुन अनेक भक्त येथे मोठ्या प्रमाणात नवस बोलण्यासाठी तसेच बोललेले नवस फेडण्यासाठी सुध्दा येतात.दर सोमवारी राञी महाआरती होते.मंदीराच्या मागच्या बाजुला एक शिव-पार्वती मंगल कार्यालय मंदीर समितीने लोकवाट्यातून बांधले आहे व ते अत्यंत वाजवी दरात सर्वांसाठी उपलब्ध असल्याने अमीर-गरीब कुटूंबातील लग्नकार्य येथे होतात. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झाले म्हणुनच नव्हे तर विकासाच्या बाबतीतही हंडरगुळी नगरी एक आदर्श माॅडेल बनले आहे.
येथील शिवालय हे शेकडो वर्षा —पासून पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान व जाग्रतदेवस्थान आहे. श्रावणातील दर सोमवारी मंदीरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.मंदीरापुढे बेल,फुल,श्रीफळ विक्री स्टाॅल लावले जातात. विशेष म्हणजे हिंन्दू - मुस्लिम समाजासह विविध धर्मातील जाणकार व्यक्तींने दिलेल्या वर्गणीतुन मंदीराचा कळस स्थापना व जिर्णोधार हा कार्यक्रम २० वर्षापुर्वी मोठ्या उत्सहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. 'करपुराची आरती करु शिवशंभोला, ग्रामदैवत शिवमंदीर हंडरगुळीला' अशा प्रकारची आरती या मंदीरावर आधारित मंदीराचे पुजारी विश्र्वनाथ अप्पा स्वामी यांनी तयार केली आहे.
0 टिप्पण्या