Ticker

6/recent/ticker-posts

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या



चित्रा न्युज प्रतिनिधी 
देवणी :- शेतातील नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे ? या विचाराने चिंताग्रस्त बनलेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरधाळ (ता. देवणी ) येथे घडली.
गुरधाळ (ता. देवणी ) येथील श्रीधर पंढरी घोगरे (५२ ) यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा देवर्जन अंतर्गत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या शाखेतून कर्ज घेतले. याशिवाय आजूबाजूच्या बाजारपेठ गावातील सावकारांकडून तसेच नातेवाईकाकांडून हात उसने पैसे ही घेतले होते. मात्र अतिवृष्टीमुळे शेती नापीक बनल्याने बँकेचे कर्ज आणि नातेवाईकाकांचे घेतलेले पैसे कसे फेडायचे ? या विचाराने ते मागील १५ दिवसांपासून चिंताग्रस्त बनले होते.
शेवटी कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाची भूमिका घरातील स्लॅबला गळफास लावून आत्महत्या केली. मात्र डॉक्टरांनी तपासणी त्यांना मृत घोषित केले. ही घटना १६ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजेच्या सुमारास घडली. मयत  यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा दत्ता श्रीधर घोगरे व ३ मुली आहेत. त्यांना ७० आर व सर्वे नंबर ७३/१ मध्ये २१ आर तसेच ७३/२ मध्ये ४९ आर जमीन आहे. या शेतीवरच त्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा देवर्जन बॅंक व सोसायटीचे अंदाजे ७० ते ८० हजार रुपयांचे कर्जबाजारी झाले होते. तसेच त्यांनी जवळच्या नातेवाईकाकडूनही मोठ्या प्रमाणात हात उसने पैसे तसेच सावकाराकडून आवाजात स्वभावाने कर्ज घेऊन महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आपल्या शेतीत बी बियाणे खते
बाजारपेठेतून खरेदी करून कृषी सेवा केंद्रातून खरेदी करून पेरणी केलेली होती पण गेल्या एक महिन्यांपासून पावसाने उघड दीप दिली आहे पेरणी करूनही शेतातील कोवळे पिके करपून जात होती या विवेचनेत ते होते यातूनच ते नैरस्यग्रस्त झालेले व मनाने खिन्न झालेले होते आपण घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विचारानेच ते वैचारिक दृष्टीने वैफल्यग्रस्त झाले होते यातूनच त्यांनीही आत्महत्या केली असल्याची चर्चा असून ते मनमिळावू आणि कष्टकरी मेहनती शेतीवरच आपले उपजीविका चालवीत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. याबाबतीत देवणी पोलीस स्टेशनला त्यांचे भाऊ दामोदर पंढरी घोगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या