मला सभापती पदाचा मुळीच मोह नाही.... भास्कर ताजने कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती.
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : स्थानिक शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी काही संचालकांनी हालचाली सुरु केल्या आहेत याबाबत काही संचालकांनी दि. २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले या निवेदनातुन भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी कळविले.
सदर या निवेदनातुन सभापती भास्कर ताजने यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याबाबत पुढील बाबी नमुद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संचालकांना विश्वासात न घेता कामकाज करणे. बाजार समिती नियमानुसार बाजार समितीचे दैनंदिन कामकाज न चालविणे संचालक मंडळ ठरावानुसार कारवाही बुकात नोंद न घेणे बाजार समितीत विकासात्मकदृष्ट्या कामकाजाच्या निविदा प्रक्रिया कायदेशीर नियमानुसार न राबविणे अविश्वास आदी कारणे प्रस्ताविता करण्याकरिता पुढे आले आहे.
*या बाबत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती भास्कर ताजने यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट करीत*
*मी, सभापती पदाचा कार्यभार दि. १३ मे २०२३ रोजी स्वीकारला. त्यावेळी बाजार समितीकडे स्वतःच्या उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. तेव्हा सर्व संचालकांना विश्वासात घेऊन स्वतःची सामूहिक वर्गणी जमा करून चंदनखेडा उपबाजार येथे धर्म काटा आणि शेडचे बांधकाम केले. यामुळे बाजार समितीला लाखोचे उत्पादन मिळू लागले. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात दोन खाजगी जिनिंग आहे.. पणन महासंघाला विनंती करून दोन्ही जिनिंग मध्ये सीसीआय खरेदी सुरू केली. यातून बाजार समितीला लाखोचा शेष मिळाला. परिणामतः बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा थकीत तीस महिन्याचा पगार मी माझ्या कार्यकाळात करू शकलो. शेतकरी बांधवांसाठी हक्काचे कोणतेही आवाराचे ठिकाण नव्हते. आम्ही सतत मागणी केल्यानंतर आता शासनाने जवळपास दोन कोटी रुपयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन मंजूर केले. बाजार समितीला स्वतःची जागा नव्हती तेव्हा वारंवार खेटा घालून शासनाकडे महसूल च्या जागेची मागणी केली. आता ते प्रकरण शासन दरबारी मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे. मी एक सामान्य शेतकरी आहे. शेतकरी बांधवांच्या वेदना मला माहित आहे. सर्व संचालक बंधू -भगिनींना वेळोवेळी विश्वासात घेवून, मी माझ्या कार्यकाळात शेतकरी बांधवांसाठी काही करू शकलो याचा मला सार्थ स्वाभिमान आहे. त्यामुळे मला पदाचा मुळीच मोह नाही. आमच्या काही संचालक बंधू -भगिनींनी माझ्यावर जे आरोप केले आहे. त्यात कुठलेही तत्थ नाही. त्यामुळे त्यांच्या सद्विवेक बुध्दीला योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी द्यावा. माझ्या ऐवजी जर एक शेतकरी सभापती होत असेल तर मला अभिमान आहे. मला सभापती पदाचा कसलाही मोह नाही असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांनी प्रसिध्दि पत्रकात कळविले आहे*
0 टिप्पण्या