Ticker

6/recent/ticker-posts

पदोन्नतीत घोटाळा करणा-यांचे चौकशीचे आदेश; बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल!


तत्कालीन शिक्षणाधिकारी सतीश चौधरी व प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांची होणार चौकशी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार : नंदुरबार जिल्हा परिषद च्या शिक्षण विभागातील सुभाष मारनार प्रशासन अधिकारी व तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री.सतीश चौधरी यांनी शासनाची अधिसूचना,शासन निर्णय,न्यायालयाचा आदेश डावलून घोळ करून सेवा जेष्ठ मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता वंचित ठेवल्याने संबंधितांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ मधील कलम ३(१ )जी  ३(१)एस,३(२)७ नुसार गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून दिनांक २२ जुलै २०२५ रोजी  जिल्हाधिकारी नंदूरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार व पोलीस अधीक्षक नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.त्या निवेदनाची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदूरबार यांना दिनांक २६/०८/२०२५ रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पदोन्नतीत घोटाळा करणा-या शिक्षण विभागातील अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. 
                        मनोज सोमनाथ साळवे केंद्रप्रमुख मालपाडा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदूरबार हे जिल्हा परिषद च्या शिक्षण विभागात 6 फेब्रुवारी १९८९ ला प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत लागले,त्यांना  सेवाज्येष्ठतेने जि.प. ने  २८ एप्रिल २००८ रोजी केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिली आहे. त्या नुसार जि. प. ने सन २०१९ मध्ये विस्तार अधिकारी (शिक्षण) पदी पदोन्नती साठी सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध केली होती त्यात  अनु. जातीचे  २ व अनु. जमातीचे ४ कर्मचाऱ्यांचे आवश्यक कागद पत्र जमा करण्यात आली.परंतू नवीन यादीत मनोज साळवे  पेक्षा शैक्षणिक पात्रतेत व सेवाज्येष्ठतेत सर्व सवर्ण कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे नाव वरच्या स्थानावर ठेवून अन्याय करण्यात आला.
                     डिसेंबर २०२२ २०२३ मध्ये नियम बाह्य व चुकीची पदोन्नती प्रक्रिया राबवून त्यांच्या पेक्षा सेवा कनिष्ठ केवळ ओपन कॅटेगरी च्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती चा लाभ दिला आहे. त्यांची केलेली पदोन्नती ही शासन अधिसुचनेतील निकष मार्गदर्शक तत्वे शासन आदेशातील तरतुदी नुसार खालील निकष नियमा प्रमाणे चुकीचा आहे.केंद्रप्रमुख या निम्न पदाचा विचार केलेला नाही.शासन आदेशानुसार शुध्दिपत्रक प्रसिध्द करण्यात आलेले नाही.केंद्रप्रमुखांना डावलून मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले आरती शिंपी, ज्ञानेश्वर मगन चिते यांना नियम बाह्य पदोन्नती दिली आहे व आता पुन्हा कैलास लोहार व संजय पाटील यांचे नाव पदोन्नती साठी निश्चित केली आहेत.
                   संजय मच्छिन्द्र पाटील यांची नोकरीची सुरवात तारीख सेवा पूस्तकात ७ फेब्रुवारी १९८९  असताना खोटी तारीख  व नियम बाह्य दस्त ऐवज आधारे खातरजमा न करता शिक्षणाधिकारी सतीश चौधरी व प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांनी पदोन्नती दिली आहे.यादीतील २८ नंबरच्या कर्मचाऱ्यांना वगळून ३१ ,७७ नंबरच्या ओपन कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांना मनाने पदोन्नती दिली.मागासवर्गीय कर्मचा-यांना  त्यांच्या हक्काच्या पदोन्नती पासून जाणिव पुर्वक व षडयंत्र करुन वंचित ठेवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या