चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट्स कौन्सिल,क्रीडा व युवक सेवा संचानालय, महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन द्वारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन द्वारा महाराष्ट्र स्टेट अक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिकस जज कोर्स व परीक्षाचे आयोजन
दिनांक 29,30 व 31 ऑगस्ट 2025 ( शुक्रवार, शनिवार व रविवार ) ला स्थानिक विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती, चंद्रपुर येथे करण्यात आले आहे.
या कोर्स ला मार्गदर्शन करण्यासाठी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जिमनॅस्टिकस FIG व जिमनॅस्टिकस फेडरेशन ऑफ इंडिया GFI द्वारा मान्यताप्राप्त इंटरनॅशनल अक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिकस एक्सपर्ट कोच अँड लेव्हल 01 जज यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या कोर्स मध्ये लिमिटेड प्रवेश फक्त 30 पुरुष आणि स्त्री क्रीडा शिक्षक व स्पोर्ट्स कोच यांनाच देण्यात येणार आहे.
या कोर्स च्या सविस्तर माहिती करीता संपर्क मुख्य आयोजक - दुर्गराज रामटेके ,संस्थापक व सचिव चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर यांचेशी
मोबाईल -9067758618 वर संपर्क साधावा असे आवाहन चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिक असोसिएशनचे चेअरमन नीलेश गुंडावार, आशुतोष गायनेवार, शीतल रामटेके,अँड. राजरत्न पथाडे, प्रा संगीता बांबोडे, बी एल करमनकर, संजय माटे, दीक्षांत रामटेके, ऋतुजा माटे,राकेश राय, सुरेंद्र सिंग चंदेल, संदिप पंधरे, तन्नू आडे, महेक शेख , पांडुरंग भोयर इत्यादी नि केलेले आहे.
0 टिप्पण्या