Ticker

6/recent/ticker-posts

सोहळा दातृत्वाचा...एक हात मदतीचा हा अभिनव उपक्रम संपन्न.


अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांचा अभिनव उपक्रम*



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे सोहळा दातृत्वाचा एक हात मदतीचा हा अभिनव उपक्रम दिनांक 18/08/2025 ला रुग्णालयाच्या ओपीडी  सभागृहात पार पडला.
         या अभिनव उपक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूरचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी एक लक्ष रुपये किमतीचे स्ट्रेचर व व्हिल चेअर उदात्त हेतूने दान देऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. यासोबतच विकृतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक तथा रक्तपेढीचे प्रमुख डॉ.अमित प्रेमचंद यांनी रक्तपेढीला 17 हजार रुपये किमतीचे डोनर चेअर देणगी स्वरूपात दान करून सामाजिक जाणिवेचा परिचय करून दिला.
         सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून  माधुरी कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निवृत्ती जीवने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित प्रेमचंद, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जन औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.अरुण हुमणे, नेत्र चिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दिलीप कुमरे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनील भैसारे, अस्थिरोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सत्यजित जगताप, विकृतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मिलिंद उलेवार, त्वचारोग विभागाचे विभाग प्रमुख  डॉ. वैशाली वानखेडे, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. दीप्ती श्रीरामे, जीवरसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. प्रीती पुप्पलवार, जीव रसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मोटघरे, कान नाक घसा शास्त्राचा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विपिन इखार, भुलतज्ञ विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश नागमोते, न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. कुचेवार, शल्य चिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मयूर बंडावार, भुलतज्ञ विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ठाकरे, सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. रजनी तोरे, महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रमोद आगलावे, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री संदेश चव्हाण, अधिसेविका सौ ज्योती कोटांगले, दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाझारे याप्रसंगी उपस्थित होते.
              
याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी आपल्या मनोगतातून समाजातील प्रत्येक व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देत समाजाप्रती काहीतरी देणे लागतो ( Pay  Back to Society ) या भावनेतून प्रत्येकानी दान करावे. तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त गरजू व्यक्तीला फुल नाही तर फुलाची पाकळी दान करून पुण्य कमवावे असे मौलिक मार्गदर्शन केले. तसेच समाजातील नागरिकांनी देणगी देण्यास आवाहनही केले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक  डॉ.भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.निवृत्ती जिवने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित प्रेमचंद, जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्याक डॉक्टर अरुण हुमणे, दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष श्री निलेश पाझारे यांनी आपल्या मनोगतातून दानाचे महत्त्व सांगून प्रत्येकाने योग्य वेळ साधून दानधर्म करण्याचे आवाहन केले.
            यावेळी दान स्वरूपात मिळालेल्या वस्तूंचे हस्तांतरण माननीय अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांचे हस्ते वॉर्ड परिसेविका, रक्तपेढीतील कर्मचारी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. कार्यक्रमाला विभागप्रमुख, प्राध्यापक, परिसेविका, नर्सिंग स्टाफ, तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी बहुसंख्येने  उपस्थित होते.
              सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वय अधिकारी भास्कर झळके, सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे, तर समाजसेवा अधीक्षक श्री उमेश आडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा यशस्वी आयोजन करून आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजसेवा अधीक्षक सर्वश्री हेमंत भोयर, भूषण बारापात्रे, प्राजक्ता पेठे, योगिता माळी, नवीन उराडे, तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या