Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा फायटर्सच्या निवेदनावर सीईओ यांची तात्काळ कार्यवाही; शिक्षण,बांधकाम,पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दालनात बोलवले!

पिंपळखुटा मोठा तोलवापाडा गांवातील समस्या सोडवण्यासाठी सीईओचे तातडीचे निर्देश

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 नंदूरबार :जल जीवन मिशन योजनेंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाडा येथे पाण्याची सुविधा  करा,अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाडा व छोटा तोलवापाडा गांवात  मध्यस्थळी मंजूर झालेली जिल्हा परिषद  शाळेची इमारत बांधकाम करा,अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाडा  गांवात अंगणवाडी सुरू करा,रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सर्व समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण, बांधकाम, पाणीपुरवठा अशा सर्व विभागातील प्रमुख अधिका-यांना आपल्या दालनात बोलावले व तात्काळ समस्या सोडवण्यासाठी निर्देश दिले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्राध्यापक सा-या पाडवी,मंगल वसावे,दिनेश वसावे,सायसिंग वसावे,रमेश वसावे,निमजी वसावे,दिल्या वसावे,शिमल्या वसावे,खुमानसिंग वसावे, केल्ला वसावे,ईश्वर वसावे,बाज्या वसावे,सत्या वसावे,प्रविण वसावे,पाश्या वसावे, गणेश वसावे,कालूसिंग वसावे,दित्या वसावे,सिंगा वसावे,भिका वसावे,सोन्या वसावे,रणजित वसावे,जयश्री वसावे,गुलाबसिंग वसावे इत्यादी ४० पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
                         अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाडा व छोटा तोलवापाडा  हे  पाडे गांव ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येते.या गांवात एकूण लोकसंख्या ३५०० पेक्षा अधिक आहे.स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही पिंपळखुटा मोठा तोलवापाडा व छोटा तोलवापाडा  सारख्या गांवातील बालकांना शिक्षणासाठी अद्याप शाळेची इमारत बांधण्यात आलेली नाही.रतवाई नदीवरून जीवघेणा प्रवास करून पिंपळखुटा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत जातात. म्हणून पिंपळखुटा मोठा तोलवापाडा व छोटा तोलवापाडा या गांवात मध्यस्थळी तात्काळ जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधकाम सुरू करण्यात यावे.या मोठा तोलवापाडा गांवात एकूण ६६ कुटुंब राहत आहेत.स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही पिंपळखुटा मोठा तोलवापाडा सारख्या गांवातील बालकांना शिक्षणासाठी साधी अंगणवाडी नाही.त्यामुळे बालके शिक्षणापासून तसेच पोषक आहार व सरकारी योजनांपासून वंचित आहेत.
                          अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा तोलवापाडा गांवातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगरद-यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे. हर घर नल चा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे. पिंपळखुटा मोठा तोलवापाडा सारख्या आदिवासी  दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहचली आहे,पाणी मात्र पोहचलेच नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या