नाशिक येथे उद्या आदिवासींचा ऊलगुलान जन आक्रोश मोर्चा
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार : सकल आदिवासी समाजातर्फे दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथील तपोवन मैदान ते आदिवासी विकास भवन पर्यंत ऊलगुलान जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या ऊलगुलान मोर्चात महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी विद्यार्थी,पालक,गांवकरी,समाजसेवक,लोकप्रतिनिधी व सर्व आदिवासी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व मोर्चा यशस्वी करावा,यासाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी जाहीर आवाहन केले आहे.
शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची १७९१,पदे बाह्य स्त्रोताद्वारे म्हणजे खाजगीकरण द्वारे भरण्याचा शासन आदेश रद्द करावा,शासकीय आश्रमशाळेतील व वस्तीगृहातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रोजंदारी व तासिका तत्वावर हजर करून घ्यावे,१७ संवर्ग पेसा क्षेत्रातील पदभरती सुरू करा,शासकीय व निमशासकीय सेवांमधील अनु जमातीचा अनुशेष भरा, बोगस आदिवासींनी बळकाविलेली १२५२० पदे रिक्त करुन ती खऱ्या आदिवासींमधून भरा, शासकीय वसतिगृहातील सेंट्रल किचन योजना बंद करा, डीबीटी योजना बंद करा,५ वी अनुसूचीचे सर्व हक्क व अधिकार लागू करा,वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा,अशा आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा ऊलगुलान जन आक्रोश मोर्चा नाशिक येथील तपोवन मैदान पासून आदिवासी विकास भवन नाशिक पर्यंत निघणार आहे.
0 टिप्पण्या