Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी येथील बैल बाजारावर मंदी नामक विघ्न..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-गुरांची ने-आण करताना कांही (संघटना) व्यक्तींकडून होणारी मारहाण तसेच कांही ठिकाणी पोलिसांकडून होत असलेला मानसिक,आर्थीक ञास आणि दुधाळ प्राण्यांच्या व्यवहारात येणारे ना,नाविध अडथळे तसेच गोवंश हत्या बंदी कायदा,आदी कारणांमुळे कुरेशी समाजाला बीफ बंदी करावी लागली.यामुळे कुरेशी समाजावर कांहीअंशी आर्थिक मंदी आली आहे
 लातुर जिल्ह्यातील कुरेशी समाजाने गत कांही दिवसा पासून बेमुदत काळासाठी संपाचे हत्यार उपसल्या मुळे भारताच्या अनेक राज्यात प्रसिध्द असलेल्या *हंडरगुळी* (ता.उदगीर) येथील बैल बाजारात ग्राहकांची संख्या रोडावली असून या बाजारावर मंदी नावाचे विघ्न घोंगावू लागले आहे.
विविध जातीचे बैलं,गाई,म्हशी योग्य दरात मिळणारा व सलग अडीच (शनिवार,रविवार पुर्ण व सोमवार अर्धा) दिवस भरणारा भारतातील एकमेव असा गुरांचा जंगी बाजार लातुर जिल्ह्यातील हंडरगुळी या गावात भरतोय.म्हणुन राज्यासह
आंन्ध्र,कर्नाटक,तेलंगणा,झारखंड, बिहार,दिल्ली सह इ.परराज्यातुन पशूंच्या खरेदी,विक्रीसाठी शेतकरी व व्यापारी हंडरगुळीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात येत असतात.
परंतू,गत कांही महिण्यापासून वरील कारणांमुळे बाजारात खरेदीदारच येत नसल्याने जनावरांची आवक ही मंदावली आहे.
या व इतर ठिकाणच्या बाजारात ही खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नाहीत. म्हणुन त्या,त्या ठिकाणचे आठवडी बाजारात गुरांना विकत घ्यायलाच कुणी येईना.आणि चुकून कुणी खरेदीदार आलाच तर गुरांना योग्य तो दर मिळेना.यामुळे गुरांची खरेदी, विक्री करुन आपापला प्रपंच बघत असलेले शेतकरीबांधवांवर ही मोठे आर्थिक संकट आले आहे. 
 प्राणी संरक्षण कायद्याचा आधार घेत अनेक गट,संघटना जनावरांची वाहतूक करताना अडवणुक करतात तसेच मारहाण ही करत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीला आले आहेत.व हे कमी म्हणुन की काय कांही ठिकाणी पोलिसांकडून पण अडवणूक करणे,आर्थिक ञास देणे.असे प्रकार ही उघडकीस आले आहेत.म्हणुन गत कांही दिवसा पासून कुरेशी समाजाने बेमुदत संप पुकारला असल्याने याचा आठवडी बाजारावर व अर्थव्यस्थेवस आर्थिक मंदीचे विघ्न घोंगावत आहे.....
२०१५ च्या महाराष्ट्र प्राणी संरक्षण {सुधारणा} या कायद्यानुसार कोणत्याही प्रकारच्या गुरांची ने,आन करण्याची परवानगी आहे.सध्या बीफ मध्ये कायद्याने फक्त म्हशींची कटाई करता येते.माञ गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर माञ बीफ बंदी करणे गरजेचे झाले.आणि बीफ बंदी करावी लागली.म्हणुन हा धंदा करणा-यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.असे कुरेश बिरादर समाजाचे म्हणणे आहे.
तेंव्हा या बाबत शासनाने योग्य तो तोडगा काढूण पशू पालकांसह व्यापा-यांवरील आर्थिक विघ्न दुर करावे,अशी मागणी कुरेशी समाज बांधवातुन केली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या