चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-दि.२४ रोजी शेळगाव ता.चाकुर च्या तिरु नदी पुलाखालील पाण्यात एका १५ते२५ वयाच्या अज्ञात युवतीचा प्रेत ट्राॅली बॅग मध्ये कोंबून अज्ञात मारेकर-याने टाकले असल्याचे उघडकीस आल्याने सर्वञ एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणु वाढवणा ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा नोंद केला असून,एलसीबी लातुर तसेच वाढवणा,चाकुर पोलीस याचा तपास करत आहेत.
दरम्यान हे प्रेत कुणाचे व कुठले? तसेच मारेकरी कोण,किती व कुठले? यासारखे प्रश्न पोलिसांसह जनतेला पडले असून सदर प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विविध पथके कामाला लागले असलेतरीही मयता बाबतची माहिती देण्याचे आवाहन वाढवणा पोलिसांनी केले असून १) काळ्याची रंगाची ठिबके, ठिबके एक्स.एल साईजचा हाफ बाह्याचा टाॅप.२)एल साईजचा जर्कीन.३)बदामी रंगाचा ब्रा४)काळेपिवळे ठिपके असलेली पॅंन्ट.५)पांढ-या रंगाची निकर तसेच दोन्ही हातात चमकणारे स्टोन असलेल्या बांगड्या. डाव्या पायात काळा दोरा.या वस्तू मयताच्या अंगावर आढळून आल्या असून या बाबत पो.स्टे. वाढवणा बू. येथे गुरनं.२३०/२५ कलम.१०३(१) २३८ बीएनएस नुसार गुन्हा दाखल झाला आहे.माञ अद्यापही ओळख पटलेली नाही.तेंव्हा अज्ञात मयत स्ञी बद्दल कुणाला कांही माहिती असेल तर सपोनि.एस.पी.गायकवाड.
९६५७३३११००
पोउपनि.पी.एम.हालसे.
९५५२७८१०९१
पोकाॅ.एस.आर.केंद्रे.
९८८१७२५२९९
यांच्यासह ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणातली मयत स्ञी कोण व कुठली तसेच तिला का,कधी मारुन आणुन येथे टाकले?यासारखे सवाल उपस्थित झाले असून सदर प्रकरणी पोलिसांचे विविध पथके कामाला लागले असले तरी हे एक प्रकारे आरोपीने पोलिसांना चॅलेंजच दिले आहे.आणि हे चॅलेंज कशाप्रकारे पोलिसं हॅंन्डेल करतात.याकडे या परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
*मयत अज्ञात स्ञी बद्दल माहिती मिळविण्याचे पोलिसांचे प्रयत्न चालूच आहेत.आणि लवकरच यातील सत्यता उघडीस आणू.तथापी याबद्दल जनतेस कांही पत्ता लागला तर वरील नंबरवर पोलिसांशी संपर्क साधावा,त्यांचे नाव गुप्प ठेवले जाईल.*
**एस.पी.गायकवाड
सपोनि.वाढवणा पो.स्टे.*
0 टिप्पण्या