विठ्ठल पाटील
लातूर :-दि.२७ रोजी राञी १० वा.पासून या भागात वरुणराजा जोरदार बॅटिंग करत असल्याने ८ दिवसापुर्वी शुन्य टक्के पाणीसाठा असलेला तिरु म. प्रकल्प व नदी या पावसामुळे पुर्णत: भरुन वाहिल्याचे समजते.तसेच या ठिकाणाहून जवळच असलेल्या वडगाव-टाकळगाव येथे ही पावसाने हाहा:कार माजविल्याने या दोन्ही गावासाठी असलेल्या कोल्हापुरी बंधा-यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने वडगाव आणि टाकळगावचा संपर्क तुटला आहे.
८ दिवसापुर्वी शुन्य टक्के पाणीसाठा असलेला तिरु प्रकल्प व नदी दि.२७ रोजी राञीपासून पडत असलेल्या नाॅनस्टाॅप पावसाने पुर्णत: ओसांडून वाहताना दिसतेय.या पावसामुळे या भागातील जनजिवन पुर्ण विस्कळीत झाले असून २ दिवसापासून सुर्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे.
१० वर्षापुर्वी श्रीं ची स्थापना होताच राञी.१० वा.मुसळधार पाऊस सुरु झाला होता.आणि त्या एका राञीत पावसाने सर्वञ धुमाकुळ घातला.व तिरु नदीसह प्रकल्प ही तुडूंब भरला होता.आणि यंदा ही तशीच अवस्था झाली आहे.कारण,दि.२७ रोजी श्री ची स्थापना होताच राञी.१० वाजता मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आणि दुस-या दिवशीही मोठा पाऊस पडतच राहील्याने हंडरगुळी व परिसरावर आभाळच कोसळले ! असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
या वर्षिच्या पावसाळ्यात चाकुर ते हाळी रौडवरील बंदईच्या पुलावरुन पाणी जात असल्याने वाहतूक कांहीवेळ ठप्प होती.व येथील तिरु नदीला प्रथमच पुर आल्याने नदीवरील पुलावर हा पुर बघण्यासाठी भरपावसात जनतेनी गर्दी केली होती.
या पावसामुळे परिसरातील लहान- मोठे तलाव,डबके,ओहोळ,नद्या या दुथडी भरुन वाहत असून तिरु मध्य. प्रकल्पाचे दरवाजे अटोमॅटिक आहेत म्हणुन ते उघडले असून नदी,प्रकल्पा शेजारील शेतकरी व जनतेनी दक्षता घ्यावी.आणि झालेल्या नुकसानीची तात्काळ माहिती द्यावी.
दिलीप मुंगे
सहाय्यक शेतकी अधिकारी
वाढवणा मंडळ.ता.उदगीर
0 टिप्पण्या