लाच खोर तलाठी यांच्या विरोधात कारवाई करण्याची प्रशासनाकडे मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : तालुक्यातील पीपरी (देशमुख) येथील शेतकऱ्यांकडून तलाठी अनिल गहुकर यांनी लाच मागितल्याचा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन समोरील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले.
या वरील प्रकरणी प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र कारवाई न झाल्याने संतप्त शेतकरी व भाजयुमो कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आल्यानंतर प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांनी लाचखोरीसारख्या गंभीर प्रकरणात फक्त आश्वासन देऊन वेळ काळुपणाचे काम केल्याचा आरोप केला आहे.
या निषेधार्थ भाजयुमो कार्यकर्त्यांनी "विरूगिरी" करत भ्रष्टाचाराविरोधात शोले स्टाईल आंदोलन करून आवाज बुलंद केला आहे.
या आंदोलनामुळे शेतकरी व प्रशासन यांच्यातील तणाव वाढला असून, सामाजिक तसेच राजकीय वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सतत दुर्लक्षित होत असल्याने स्थानिक युवक देखील आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषी तलाठीवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा हा संघर्ष आणखी तीव्र होईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या