चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : अपघातग्रस्त कुटुंब स्वर्गीय प्रदीप तपासे यांच्या घरी माजी जिल्हाप्रमुख कामगार सेना सुयोग भोयर यांनी भेट देऊन टोल कंपणीवर कारवाई करून तपासे कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
संबंधित कंपनीच्या गलथान कारभाराला बळी पडुन स्व. प्रदीप तपासे यांचा जीव गमावला स्व.प्रदीप तापासे यांचा काही दिवसा अगोदर पडोली इथे रस्त्यांवरील खड्डे मुळे त्यांचा जीव गेला, त्यांचा पाठीमागे 2 मुली,,वृद्ध आई वडील अणि पत्नी असा त्यांचा परिवार,,
आज त्यांचावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कमावता व्यक्ति गेल्यामुळे संपूर्ण जबाबदारी आज त्यांच्या पत्नीवर आलीआहे.
या संबंधीत कंपनीच्या गलथान कारभारामुळेच स्वर्गीय प्रदीप तपासे यांचा जीव गमावला त्याचा मृत्युला जबाबदार असणाऱ्या या टोल कपनीला काळ्या यादीत समाविष्ट करुन यांचा कत्राट रद्द करा.
या सर्वस्व प्रकरणाला टोल कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप माजी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख सुयोग भोयर यांनी केला आहे.
सदर कंपणीवरती जो पर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यन्त आम्ही शांत बसणार नाही असा इशारा हि सुयोग भोयर यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या