Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.मुबारक कुरैशी यांना राष्ट्रीय सेवा योजना ,रा तु म नागपूर विद्यापीठाचे 'उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी' पुरस्कार

 श्री सुदामा शिक्षण संस्था, तुमसर द्वारा संचालित गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय, तुमसर येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो.डॉ. मुबारक कुरैशी यांना  राष्ट्रीय सेवा योजना विभाग,  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर तर्फे महाविद्यालय स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्र 2024 -25 साठी "उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी" म्हणून विद्यापीठ स्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त 24 सप्टेंबरला आयोजित कार्यक्रमात, कार्यक्रमाचे अध्यक्ष  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर चे  कुलगुरू मा. डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या शुभहस्ते व प्र- कुलगुरू मा. डॉ. सुभाष कोंडावार तसेच संचालक, राष्ट्रीय सेवा  योजना विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर डॉ .सोपान देव पिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रो. डॉ. मुबारक कुरेशी यांचे मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आले.
 सदर कार्यक्रमातच गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय , तुमसरला राष्ट्रीय सेवा योजनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल 'उत्कृष्ट महाविद्यालय' पुरस्कार सुद्धा मिळाला. महाविद्यालयातर्फे हा पुरस्कार प्राचार्य डॉ.युवराज सेलोकर यांनी स्वीकारला. तसेच महाविद्यालयातील कु. आकांक्षा सांगोळे हिला 2024- 25 उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
प्रो. डॉ. मुबारक कुरैशी यांनी आपल्या यशाचे श्रेय श्री सुदामा शिक्षण संस्था, तुमसरचे संस्थापक, मा. श्री नारायणरावजी तितीरमारे , सचिव, मा. श्री प्रमोदरावजी तितीरमारे, अध्यक्ष, मा. श्री शरदरावजी तितीरमारे, उपाध्यक्ष  मा. श्री विनोदजी तितीरमारे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज सेलोकर व महाविद्यालयातील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना पथक यांना दिले.


नाव : डॉ. मुबारक कुरैशी
 प्रोफेसर व इतिहास विभाग प्रमुख गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय, तुमसर, जि. भंडारा

 शिक्षण : बीएससी( गणित), 
एम ए (इतिहास) नागपूर विद्यापीठ टॉपर 1992 , चार सुवर्णपदक व तीन रोख बक्षीस,एम ए (इंग्रजी) , एम फिल (इतिहास)
 पी एच डी (इतिहास)- मार्च 2004
पीएचडी चे विषय : "सत्रहवी शताब्दी के भक्ती आंदोलन मे विकसित हिंदू- मुस्लिम समन्वय का महाराष्ट्र पर प्रभाव "

 पीएचडी मार्गदर्शक,(2006 पासून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर 

 पीएचडी संशोधन मार्गदर्शन: 1)मार्गदर्शनाखाली 6 संशोधकांना पीएचडी पदवी बहाल    
2)सध्या मार्गदर्शनाखाली 6 पीएचडी संशोधकांचे कार्य प्रगतीवर

ग्रंथ प्रकाशन : 
1) भारताचा इतिहास ( प्रारंभा पासून ते इ. 1525 पर्यंत)
2) भारताचा इतिहास (इ.स. 1526 पासून ते 1761 पर्यंत)
 3)भारताचा इतिहास (इ.स. 1764 ते 1885)
4) 17 वी सदी के महाराष्ट्र मे भक्ति आंदोलन 
सन्मान व सत्कार :1) "श्री समर्थ रामदासी मठ, भंडारा" या शोधनिबंधाकरिता श्री समर्थ रामदासी मठ ,भंडारा द्वारे सत्कार
 तसेच 2004 ला पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार 
2)हिंदू- मुस्लिम सहिष्णुता या शोध विषयावर पीएचडी केल्याबद्दल भारतीय सामाजिक विज्ञान व लोकसाहित्य संशोधन संस्था ,परभणी यांच्यातर्फे सत्कार 
3)विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, नागपूर यांच्यातर्फे' महिला सन्मानपत्र' देऊन सन्मान 4)"कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमन सेंट इन भक्ती मुव्हमेंट ऑफ मीडियेवल महाराष्ट्र" या विषयावर उत्कृष्ट शोध निबंध लिहिल्याबद्दल सेंट्रल इंडिया जर्नल ऑफ हिस्टॉरिकल अँड आर्किऑलॉजिकल रिसर्च पन्ना, मध्य प्रदेश द्वारा सन्मान
* "एमिनेन्ट  रिसर्चर अवॉर्ड": इंटर डिसिप्लिनरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन "रायझिंग ऑफ गलोबल इंडिया -एस्पिरेशन पॉसिबिलिटीज अँड चेंजेस, दुबई येथे " समाज विज्ञानाच्या क्षेत्रात उत्तम शोध कार्य केल्याबद्दल ॲमिनेन्ट रिसर्च अवॉर्ड" (23 नोव्हेंबर 2023)
*  शोध निबंध प्रस्तुती : 1)भगवानदास गुप्त स्मृती शोध संस्थान, (झाशी ,उ. प्र.)
* 2)  स्वराज्य संस्था संचालनाय संस्कृती विभाग, मध्य प्रदेश शासन , भोपाल (म. प्र.)
*  3)माखनलाल चतुर्वेदी शासकीय  स्नातकोत्तर कन्या महाविद्यालय, खंडवा (म. प्र.) 
* एस एस जैन सुबोध महाविद्यालय, जयपुर, राजस्थान
* छत्रसाल शासकीय  स्नातकोत्तर महाविद्यालय , पन्ना( म.प्र.)
*  भारतीय सामाजिक विज्ञान व लोकसाहित्य संशोधन संस्था 
प्रकाशित शोधनिबंध : जवळपास 50 राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित 

सदस्यत्व : 1)अध्यक्ष, ऐतिहासिक धरोहर शोध यात्रा (भंडारा -गोंदिया जिल्हा)
 2)सदस्य ,अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद 
3)सदस्य, मध्य प्रदेश इतिहास परिषद भोपाल 
4)सदस्य, ग्रीन हेरिटेज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, भंडारा 5)सदस्य इंडियन रेड क्रॉस सोसायटी


मो सईद शेख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या