Ticker

6/recent/ticker-posts

यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी : राजकुमार भगत


चित्रा न्युज प्रतिनिधी 
यवतमाळ :-सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ तथा आझाद समाज पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले.
या निवेदनात शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रत्येक शेतकऱ्यास हेक्टरी ₹१,००,०००/- नुकसानभरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष व आझाद समाज पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, राजकुमार भगत यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्वरित मदत मिळणे आवश्यक आहे. पिकविमा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा व्हावेत, शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज उपलब्ध व्हावे आणि शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा,” अशीही मागणी करण्यात आली.
“शेतकरी वाचला तरच शेती वाचेल. शासनाने ही जबाबदारी गांभीर्याने घेतली पाहिजे,” असेही राजकुमार भगत यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या