Ticker

6/recent/ticker-posts

"आई ने मुलांना देशभक्त व निर्व्यसनी बनविणे गरजेचे": सौ.शुभांगी मेंढे (उत्कृष्ट शिक्षिका सन्मान सोहळा)


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-"आई पासून आपण शिकत असतो आणि आईच मुलांना घडविते. आई मुलांना डॉक्टर,इंजिनिअर बनविते पण एक चांगले संस्कार त्यांचं अंगी रुजवून त्यांना देशभक्त,निर्व्यसनी,सदाचारी, शिस्तबद्ध बनविणे ही त्या पेक्षा जास्त गरजेचे आहे. आई ने जर खरं शिष्त,संस्कार बाळाला दिले तर ती आई खरी शिक्षिका होईल,ग्राहक जागे व्हा"असे प्रतिपादन राष्ट्रीय संपर्क प्रमुख विश्व मांगल्य सभा तेजोनिधी, व स्प्रिंगडेल च्या संचालिका सौ .शुभांगी मेंढे यांनी केले.त्या शिक्षक दिन निमित्त श्री सिद्ध चिंतामणी गणेश मंदिर (वेलकम कॉलनी भंडारा )येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जिल्हा ग्राहक संघटन,नगर ग्राहक संघटन व महिला आयाम च्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्कृष्ट शिक्षिका सन्मान सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवी प्रा.श्री वामनराव तुरीले,प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध स्त्रीतज्ञ डॉ.प्रतिभा राजहंस (,लाखनी),श्री नितीनजी काकडे (पश्र्चिम क्षेत्र संघटन मंत्री_अ. भा. ग्रा. पं.) तथा श्री रवींद्र तायडे (नगर अध्यक्ष/अ. भा. ग्रा. पं.) ई मान्यवर मंचावर उपस्थित होते.

 या प्रसंगी उपस्थित सत्कार मूर्ती शिक्षिका सौ.वैशाली धारस्कर, (मुख्याध्यापिका _  शिवनारायण सारडा महिला समाज हायस्कूल भंडारा)सौ.रीना काळे ( मुख्याध्यापिका_ जकाददार कन्या हायस्कूल),सौ.स्नेहल खानापुरकर (शिक्षिका_प्रकाश हायस्कूल कारधा ), सौ.सानवी  (केतकी)देशपांडे( शिक्षिका_सनफ्लॅग स्कूल वरठि), सौ.लता ब्राह्मणकर ( शिक्षिका नूतन कन्या हाइस्कूल भंडारा)ई चे अध्यक्ष मा वामन तुरीले,प्रमुख अतिथी सौ.शुभांगी मेंढे,डॉ.प्रतिभा राजहंस यांचे हस्ते शॉल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यातआले.
प्रारंभी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. सौ.जयश्री सातोकर यांनी सूत्र संचालन केले .सौ.दीप्ती कुरोडे मॅडम यांनी प्रास्ताविक तथा पाहुणे व सत्कार मूर्तींचे परिचय करून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्री वामनराव तूरीले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की "शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.   शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी विद्यार्थी घडविले म्हणून ते राष्ट्रपती बनले.आपल्या विद्यार्थी जीवनातील आणि शिक्षिकिय पेशातील राष्ट्रीय सेवा योजना चे कार्याबद्दल आपले काही प्रसंग ही प्रा. तूरीले यांनी सांगितले.प्रमुख अतिथी म्हणून डॉ.प्रतिभा राजहंस यांनी "आपल्या संस्कृती मध्ये शिक्षकाला मातृत्व गुण आहे.राष्ट्र निर्माण करण्याचे कार्य आदर्श शिक्षकाचे आहे.प्रवाहाच्या विरूध्द दिशेने कसे पुढे जायचं हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवल पाहिजे.मुलांवर चांगले संस्कार रुजविले तर ते चांगले संस्कारी बनतील. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् हे पण एक शिक्षक व विद्वान होते"असे प्रतिपादन केले. अ.भा.ग्रा.पं.चे क्षेत्र संघटन मंत्री श्री नितीन काकडे यांनी आपल्या संबोधणात म्हटले की 'डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे जन्मदिन निमित्ताने शिक्षकाप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.गुरूचे समाजात एक विशिष्ट स्थान असतं म्हणून अश्या सन्माननीय शिक्षकांचे सन्मान व्हावे म्हणून अ. भा. ग्रा. पं. तर्फे त्यांचे सन्मान कार्यक्रम घेण्यात आले.आज अ. भा. ग्रा. पं.संपूर्ण देशात सक्रियतेने काम करीत असून 50 हजाराच्या आसपास सदस्य संख्या फोहचली आहे".असे ही म्हटले. सौ. करुणा चांदे यांनी ग्राहक गीत सादर केले.
सौ.वैशाली धारस्कर, सौ रीना काळे,स्नेहल खानापूरकर, सौ सानवी(केतकी )देशपांडे ई नी ही आपले मनोगत व्यक्त केले.समीक्षा दवंडे यांनी कविता सादर केली.सौ .श्यामला ताम्हणे नी संघटन मंत्र व शांती मंत्र म्हटले.
श्री विष्णुपंत पंडे यांनी "हम करे राष्ट्र आराधन"... हे गीत प्रस्तुत केले.आभार सौ.रासेगावकर यांनी मानले. अ.भा.ग्रा.पं.,जिल्हा ग्राहक संघटन,नगर ग्राहक संघटन,आणि महिला आयाम चे वरिष्ठ पदाधिकारी ई ची कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या