Ticker

6/recent/ticker-posts

वनोजा (देवी) ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार उघडकीस.

चक्क काँक्रिट रस्ताच गेला चोरीला.. उपसरपंच प्रशांत भंडारी यांचा संशय 



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती / चंद्रपुर : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वनोजा (देवी ) येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार उघडकीस मनरेगा अंतर्गत मंजुर सिमेंट काँक्रिट रस्ता चोरीला गेल्याची तक्रार वनोजा ( देवी ) येथील उपसरपंच यांनी संशय व्यक केल्याने गावात खडबळ उडाली आहे. 

वनोजा देवी येथील उपसरपंच प्रशांत भंडारी यांनी गट विकास अधिकारी पचायत समिती मारेगाव येथे निवेद्वारे नमुद केलेल्या तक्रारीत म. रो. ह. यो.अंतर्गत प्रवीण धांडे ते अशोक आत्राम यांचे घरापर्यंत 14 लाख 40 हजार रुपयांच्या निधीतून मंजुर सिमेंट काँक्रिट रस्ता चोरी गेल्याचा संशय व्यक उपसरपंच यांनी केला जात आहे.
मागील 18 महिन्यापुर्वी रस्ता बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आल्याचे फोटो सुद्धा काढण्यात आले. त्यानंतर ग्राम पंचायतीने नेमलेल्या कंत्राटदारांनी रस्त्यावर 80 एम एम गिट्टी सुद्धा टाकली आहे. मात्र काही दिवसा नंतर उर्वरित काम आणि कंत्राटदार दोन्ही बेपताच झाले. रस्त्यावरील पसरलेल्या गिट्टीमुळे नागरिकांना व जनावराच्या पायाला जखमा होत आहे. त्यामुळे सदर मार्गाच्या कामाची चौकशी करुन गावकऱ्यांना त्रासापासुन मुक्त करावे. या प्रकरणात जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी गाववासी यांनी रोष व्यक्त करीत उपसरपंच प्रशांत भंडारी यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या