सप्तखंजेरी वादक कु.जान्हवी घुमे यांचा किर्तनातुन समाज प्रबोधन तुफान विनोदाचा कार्यक्रम
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथे श्री.संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा दोन दिवसीय कार्यक्रम श्री. संत नगाजी महाराज देवस्थान नगाजी नगर भद्रावती येथे पालखी शोभायात्रा व विविध कार्यक्रमाचे आयोजन.
या निमित्त सप्त खंजरी वादक कु.जान्हवी घुमे यांचे किर्तन समाज प्रबोधनातुन तुफान विनोदाचा कार्यक्रम दि.९ ऑक्टोबरला श्री. संत नागाजी महाराज यांच्या पुण्यतीथी निमित्त दि.८ व ९ ऑक्टोबरला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात दिनांक ८ ऑक्टोंबरला सकाळी ७ ते १० श्री.ची घटस्थापणा, पुजा व आरती,(सहपत्नीक) सुरेश जमदाडे, सौ. छायाताई जमदाडे, मधुकर वाटेकर व सौ. वर्षाताई वाटेकर यांच्या हस्ते,दुपारी १ ते ३ वाजता महिला संमेलन मार्गदर्शक मेघाताई शेंडे प्रमुख अतिथी शुभांगीताई कुत्तरमारे, ज्योतीताई खातखेडे,छायाताई जमदाडे, सुत्र संचालन वर्षाताई वाटेकर आभार रागिणी सुत्रपवार या करतील.दु.३ ते ५ वाजता आनंद मेळावा, सायंकाळी ६-३० ते ७ वा.सामुदायीक प्रार्थना व विचार मंथन, सायं.७ ते ८ वा. पोथीचे पारायण लक्ष्मणराव चौधरी यांचे हस्ते.रात्री ८ ते १० वाजेपर्यं भजन दिनांक. ९ ऑक्टो. रोज गुरुवारला सकाळी ६ ते ७ वा. सामुदायिक ध्यान, सकाळी ७ ते ८ श्री चा अभिषेक पुजा व आरती (सहपत्नीक) मारोतराव लांडगे, सौ. कुसुम लांडगे, अभिलाष चिंचोलकर व रितीका चिंचोलकर यांचे हस्ते, सकाळी ८ ते ११ पालखी सोहळा व शोभायात्रा नगाजी महाराज देवस्थान ते मेन रोड गांधी चौक ते परत नगाजीनगर परीसरातुन नगाजी मंदिर येथे पालखी व शोभायात्रा समाप्त.
दुपारी११ते ०२ वाजता जाहीर किर्तन (गोपाल काला ) कु.जान्हवी घुमे यांचा समाज प्रबोधनपर जाहीर किर्तन व गोपाल काला यानंतर स्वर्गीयांच्या प्रतिमेला भावपूर्ण श्रध्दांजली कार्यक्रम, सत्कार समारंभ व गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. निवृत्ती पिस्तुलकर सेवनिवृत्त प्राचार्य भारती विद्यालय आर्णी पि. एच डी. "विदर्भातील नाभिक व्यवसासाचे आर्थिक अध्ययन". आर्णी जिल्हा यवतमाळ राहणार आहे.
प्रमुख अतिथी हंसराजभैया अहिर,रा.ओ.आ.अध्यक्ष भारत सरकार, प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपुर - आर्णी लोकसभा क्षेत्र, करण देवतळे आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र, मुकेश जिवतोडे शिवसेना (शिंदे) लोकसभा संघटक चंद्रपुर आर्णी क्षेत्र., समीरभाऊ वाटेकर मंडळ अधिकारी तहसील कार्यालय भद्रावती. सुनील नामोजवार भाजप शहर अध्यक्ष भद्रावती यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. सायंकाळी ६ ते ९ वाजे पर्यंत सुप्रसिद्ध गायकांचा रसिकां करीता सुगम संगीत व आर्केस्ट्रा भक्तीगीते, भावगीताचा धमाकेदार कार्यक्रम होणार आहे. तरी या दोन दिवसीय कार्यक्रमाला भाविक भक्तांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे श्री. संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीचे आयोजक रविंद्र शेंडे (अध्यक्ष), हरीश घुमे (कार्याध्यक्ष ), सचिन नक्षिने (सचिव), सुरेशराव जमदाडे (उपाध्यक्ष), पांडुरंग हणुमंते (कोषाध्यक्ष), जितेंद्र नागतुरे( सहसचिव) सतिश मांडवकर, सुधीर लांडगे, सागर घुमे यांनी आव्हान केले आहे.


0 टिप्पण्या