चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंडीपार :-सार्वजनिक दुर्गा मंदिर, दुर्गा चौक मुंडीपार येथे सुरू असलेल्या नवरात्री उत्सवानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांच्या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टर मनिष कटरे सर, एमपीडब्लू , एएनएम , आशासेविका व त्यांच्या पूर्ण चमुने तपासणीसह आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्याचे वाटप केले. महिला, तरुण तसेच जेष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद बांधकाम सभापती माननीय डॉ. लक्ष्मणजी भगत, सरपंच प्रेमलता ताई राऊत, उपसरपंच राजाभाई खान,ग्रा.पं.सदस्य सौ.सरिताताई सुरजोसे, भुरनलाल राहांगडाले,
हेमराज चौधरी, जियालाल चौधरी, हरिलाल पारधी, धर्मराज बोपचे,डॉ. होमराज राहांगडाले,नानिकराव सुरजोसे, तेजराम पारधी, शंकर चौधरी, भोजराज राहांगडाले, सावलराम बिसेन, टानेश सुरजोसे,
सार्वजनिक दुर्गा मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र बिसेन, उपाध्यक्ष भिमेश बोपचे, कोषाध्यक्ष गिरीश पारधी, सचिव आनंदराव सुरजोसे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाद्वारे नवरात्री उत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबरच आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित झाले. ग्रामस्थांकडून शिबिराचे व्यापक स्वागत करण्यात आले असून, अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नियमितपणे आयोजित व्हावेत, अशी मागणी व्यक्त करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या