Ticker

6/recent/ticker-posts

“उदय – व्यसनमुक्त समाज अभियान”


चित्रा न्युज प्रतिनिधी 
यवतमाळ :-स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि.यवतमाळ या संस्थे अंतर्गत “उदय – व्यसनमुक्त समाज अभियान” जनजागृती कार्यक्रम आज दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी बस-स्टॉप परिसर पुसद जि.यवतमाळ  येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
 “उदय – व्यसनमुक्त समाज अभियान” दिनांक ५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा शुभारंभ ५ सप्टेंबर – शिक्षक दिनाच्या शुभ दिवशी करण्यात आला. शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक दीपस्तंभ मानला जातो. विद्यार्थ्यांना योग्य संस्कार, ज्ञान व मूल्य देऊन ते भविष्यातील नागरिक घडवतात. म्हणूनच व्यसनमुक्त समाज निर्मितीत शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाद्वारे नागरिकांना व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
अभियानाचा समारोप २ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती या दिवशी करण्यात येईल. महात्मा गांधी यांनी ‘व्यसनमुक्त व संयमी जीवनशैली’ याला विशेष महत्त्व दिले. सत्य, अहिंसा आणि संयम या विचारांवर आधारित गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी व्यसनमुक्तीचा संदेश देणे हेच या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. तसेच उदय – व्यसनमुक्त समाज अभियान हे समोर दीर्घकालीन असणार आहे. या दरम्यान विविध शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि ग्रामपातळीवर व्यसनमुक्ती शपथविधी, प्रबोधनपर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, फलक, पोस्टर व पत्रकांद्वारे जनजागृती, यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नागरिक व प्रवाशांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यात आले. व शपथ घेतली तसेच "व्यसनातून मुक्ती – जीवनात प्रगती" हा संदेश फलकाद्वारे दिला.
अभियानाला नागरिक, विद्यार्थी व स्थानिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. समाजात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या