४ वर्षांपासून रस्ता बंद; वृद्ध व गरोदर महिला रूग्णांचा मृत्यू
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार : सायसिंग मोवाश्या वसावे,मुख्याध्यापक ,आदिवासी आश्रम शाळा तलाई,राहणार पिमटी पोस्ट भांग्रापाणी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांनी वरखेडी ते पिमटी, पिमटी ते पिंपरापाणी पर्यंतचा शासनांचा जुन्या रस्त्यावर अतिक्रमण करुन लोखंडी गेट बसवून पिमटी येथील ये जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या रस्ता गेल्या चार वर्षापासुन बंद करून अतिक्रमण केलेला रस्ता ग्रामस्थांसाठी तात्काळ खुला करावा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश सचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,बिरसा फायटर्स पिमटीचे निमजी वसावे,संदीप वसावे,आरशी वसावे,राजेंद्र वसावे,दिलीप वसावे,खेमजी वसावे,दिवाल्या वसावे,काड्या वसावे,रणजी वसावे,मोग्या वसावे,कालूसिंग वसावे,रवींद्र वसावे,रामसिंग वसावे,रेहज्या वसावे, रमेश वसावे,धिरसिंग वसावे,तेजला वसावे,संजय वसावे, अमिताभ वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
मौजे पिमटी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आम्ही मौजे पिमटी येथील वडीलोपार्जित कायमचे रहिवासी आहेत व त्या गावातच आमचे घर, शेती आहे. पिमटी ते वरखेळी, पिमटी ते पिंपरापाणी हा ग्रामपंचायतचा मालकीचा जुना रस्ता आहे व पुर्वी गावातील व्यक्ती हे त्या रस्त्याने ये-जा करित होते. परंतू पिमटी येथील सायसिंग मोवाश्या वसावे यांनी दादागिरीच्या बळावर हा रस्ता बंद करून लोखंडी कंपाऊंड बसवले असल्याने गेल्या दोन ते चार वर्षापासुन गावातील लोकांना वाहन घेऊन येण्यास, पायी-पायी फिरण्यास, ये-जा करण्यास गेट बंद असल्याने अडथळा निर्माण होत आहे. गावात कोणी आजारी पडल्यास किंवा गरदोर असल्यास, प्रकृती बिघडल्यास, दवाखान्यात येण्यासाठी मोठी नदी पार करावी लागते व दराखोऱ्यातुन दोन डोंगर पार करावे लागतात. वेळेवर उपचार न झाल्यास गावातील काही गावातील वयोवृध्द नागरीक तसेच काही गरोदर महिला देखील मरण पावल्या आहेत. रस्ता बंद असल्याने गावात शिक्षक, ग्रामसेवक हे वेळेवर भेट देऊ शकत नाहीत. गांवात पाणी नाही,शाळेची व अंगणवाडीची पक्की इमारत नाही,घरकुले नाहीत,रस्त्याअभावी शासनाची एकही योजना पोहचली नाही,ग्रामस्थांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.म्हणून हा पिमटी ते वरखेळी हा रस्ता ग्रामस्थांसाठी तात्काळ खुला करण्यात यावा,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.


0 टिप्पण्या