चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : शहरातील गौतम नगर (स्नेहल नगर) परिसरात अनधिकृत मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू आहे. आधीच केवळ 100 मीटरच्या अंतरावर दोन मोबाईल टॉवर अस्तित्वात असून,आता तिसऱ्या मोबाईल टॉवरचे काम सुरू झाले आहे.
या मोबाईल टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशनचा सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या धोक्याचा विचार करून नागरिकांनी वारंवार संबंधित शासकीय कार्यालयांकडे निवेदने दिली, परंतु या सबधित प्रशासनाने केराची टोपली दाखवुन अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.
म्हणूनच आजपासून शिवसेना तर्फे नगर परिषद भद्रावती समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय पद्धतीने राबवले जाणार असून, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अनधिकृत टॉवरचे काम तात्काळ थांबविणे ही शिवसेनेची व समस्त गौतम नगर (स्नेहल नगर) रहिवासी यांची प्रमुख मागणी आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना शिंदे गट तिव्र आंदोलनाचा इशारा शिवसैनिक सुरज शहा, सुमित हस्तक व गौतम नगर वासियांनी दिला आहे.


0 टिप्पण्या