चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : शहरातील गौतम नगर (स्नेहल नगर) येथे परवानगी शिवाय उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मोबाईल टॉवर विरोधातील शिवसेना (शिंदे गट) तर्फे सुरू केलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
हे आंदोलन शिवसैनिक सुरज शाहा यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे पार पडले.
आज दि.०३ सप्टेंबर ला आंदोलन स्थळी आ. करण देवतळे यांनी भेट देऊन आंदोलकांची भूमिका ऐकली. नागरिकांच्या भावना आणि शिवसेनेची ठाम भूमिका लक्षात घेऊन आमदार देवतळे यांनी सर्व मुद्दे मान्य करत आश्वासन दिले.
संबंधित मोबाईल टॉवरचे काम तत्काळ थांबविण्यात येईल. व
परवानगीशिवाय टॉवर उभारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.
याशिवसेनेच्या ठाम लढ्यामुळे प्रशासनाला झुकावे लागले आमदार देवतळेच्या विनंतीचा मान राखत आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले, मात्र गरज पडल्यास पुन्हा तिव्र लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
हे आंदोलन यशस्वी रित्या पार पडले असून, हा विजय सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा आहे असे मनोगत शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांनी व्यक्त केले.
यावेळी युवा शिवसैनिक सुमित हस्तक, महेश जीवतोडे, अर्चनाताई खंडाळे, लक्ष्मीबाई गेडाम, निर्मला पेटकर, धबुताई असूटकर, माधुरीताई फुकट, प्रियाताई तेलंग, सीमाताई वानखेडे, वैशालीताई चालखुरे, सरस्वती दानव, प्रतिभाताई नागपुरे, नंदाताई कोरडे, वैशालीताई तेलंग, नंदाताई ठमके, सिंधुताई देऊरकर, सुनिताताई उताने, अरुण मत्ते, यशवंत उताणे,अशोक चिलके, मंगला अशोक चिलके, पुष्पा किशोर सीरसैया आंदोलनात सहभागी होते.


0 टिप्पण्या