Ticker

6/recent/ticker-posts

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत ऐतिहासिक संयुक्त सभा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा :- महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित ऐतिहासिक संयुक्त सभा दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन* येथे ३ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.  
या सभेला समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक आद. मार्शल सुनील सारीपुत्त राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख आद. ॲड. मार्शल प्रकाश दार्शनिक  यांनी प्रमुख उपस्थिती लावली. तसेच केंद्रीय कमिटी सदस्य आद. मार्शल सुरेश जाधव (मुंबई) महाराष्ट्र राज्य संघटक प्रा. मार्शल अनिकेत उबाळे यांच्यासह मुंबई विभागातील समता सैनिक दल व इतर संस्था, संघटना यांचे प्रांतीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, समता सैनिक दलाचे राज्य कमिटीचे वरिष्ठ सदस्य मार्शल विजय वासनिक (यवतमाळ), महाराष्ट्राचे राज्य कार्यकारी मंडळ सदस्य मार्शल हिवराज टेंभूर्णे, विदर्भ प्रांत संघटक मार्शल निवारण कांबळे (चंद्रपूर) तसेच भंते सायरन प्रियदर्शी (बिजनौर)* यांनीही या सभेत सहभाग घेतला.  
सभेदरम्यान ऑल इंडिया बुद्धिष्ट फोरमचे महासचिव आकाश लामा आणि भंते विनाचार्य यांच्यासोबत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची रणनीती आखण्यात आली. आंदोलनाच्या माध्यमातून बौद्ध समाजाच्या हक्कासाठी न्याय्य मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त झाला.  

दरम्यान, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक आद. सुनील सारीपुत्त सर व राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख आद. मार्शल ॲड. प्रकाश दार्शनिक सर यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आदरांजली वाहिली. या सर्व पदाधिकाऱ्यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा असून त्यांनी मुंबई विभागाच्या समता सैनिक दलाच्या टिटवाळा स्थित कार्यालयास ही सदिच्छा भेट दिली.  

कार्यक्रमाच्या शेवटी, समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी "महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला" पुढील पिढीची बांधिलकी म्हणून आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प करावा असे आवाहन समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक प्राध्यापक मार्शल अनिकेत उबाळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या