Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर मंडळात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी..




नमो नेत्र संजीवनी शिबिराचा गरजुनी लाभ घ्या :- जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख 


जिल्हास्तरीय व्याख्यान कार्यक्रमात अनेक नागरिकांचा भाजपात प्रवेश....

लिंगोजी कदम  जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड          

नांदेड :-हिमायतनगर शहरात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज दि 25 सप्टेंबर रोजी हिमायतनगर मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील मंडळ अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय व्याख्यान कार्यक्रम व बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना असे सांगितले की सेवा पंधरवाडा या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालयांमध्ये नमो नेत्र संजीवनी शिबिराचे आयोजन सुरू आहे त्या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्या असे सांगून या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या हस्ते शहरातील अनेक नागरिकांनी व  महिलांनी भाजपात प्रवेश केला यावेळी जिल्हा सरचिटणीस रामचंद्र मुसळे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रसाद डोंगरगावकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष गणपत पिटेवाड,तालुका अध्यक्ष गजानन चायल ,शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड ,सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी ,महिला,बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या