Ticker

6/recent/ticker-posts

गडचिराेली जिल्ह्यात जाहिरात न देता व मुलाखती न होता आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती ❓


⭕पदभरती करणारे आरोग्य विभागातील ते...हरामखोर लुटारु कोण...❓


⭕ लाखो रुपये देऊन फसगत होण्याची शक्यता. बळी पडल्या नंतर  बोंबलणार ❓

चित्रा न्युज प्रतिनिधी 
गडचिराेली:-  राष्ट्रीय आरोग्य विभागात बोगस पदभरतीचे प्रयत्न करण्यात आले असल्याचे गडचिराेली जिल्हा परिषद परिसरात चर्चिले जात आहे. त्यात  अनेक उमेदवारांची  लाखो रुपयांची फसवणूक होणार असल्याचे सांगितले जाते. गडचिराेली जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असणारे हे कर्मचारी कोण ❓ याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.     जाहिरात न देता तसेच कोणत्याही प्रकारच्या मुलाखती न घेता आरोग्य कंत्राटी कर्मचारी म्हणून थेट नियुक्तीपत्र  दिले जाणार आहेत अशी चर्चा  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुरू आहे. अशा प्रकारच्या बोगस पदभरती करण्यासाठी  काही आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आणि जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे  लवकरच समोर  येण्याची शक्यता आहे. यापूर्वी असाच  प्रकार नाशिकमध्ये  झाला होता  आणि त्यांचा पर्दाफाश झाला होता, जिथे तीन ते अकरा महिन्यांसाठी भरती करून कायम करण्याची खोटी आश्वासने दिली गेली होती. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी, उमेदवारांनी  भरती प्रक्रियेची माहिती  अधिकृत संकेतस्थळां वरूनच घ्यावी . 
 काही ठिकाणी 'राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission - NHM)' च्या नावाने सॉफ्टवेअर व इतर पदांसाठी भरतीचे जाहिरात केली जाते. परंतु प्रत्यक्षात, NHM मध्ये अशी पदे नसतात आणि हे फसवणुकीचे प्रकार असतात. उमेदवारांनी कोणत्याही भरतीची माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून किंवा संबंधित विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच तपासावी. एखाद्या पदाबद्दल किंवा भरती प्रक्रियेबद्दल शंका असेल, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहितीची पडताळणी करावी. संशयास्पद आमिशापासून सावध रहावे . तीन महिन्यांच्या कंत्राटी भरतीनंतर कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देणाऱ्या आमीश दाखविणाऱ्या  आरोग्य विभागात काम करणाऱ्यांपासुन सावध राहावे .नाशिकमध्ये एका बोगस भरतीचा प्रयत्न उघडकीस आला होता, जिथे तीन महिन्यांच्या भरतीनंतर कायम करण्याची खोटी आश्वासने दिली जात होती. अशा वेळी, योग्य ठिकाणी तक्रार दाखल करणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कंत्राटी मनुष्यबळ भरती करत आहे ही एक अधिकृत भरती प्रक्रिया आहे? . तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता, कारण भरती प्रक्रिया आणि नोटीस जिल्ह्यांनुसार बदलतात.  
अधिकृत माहिती मिळवण्यासाठी काय करावे? जिल्हा परिषद वेबसाइट तपासा. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत भरती प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर होते,  तसे तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाइटला भेट द्या.  भरती प्रक्रियेतील जागा, पात्रता, अर्ज करण्याची मुदत आणि इतर सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात आणि सूचनांचा अभ्यास करावा. 
काही वेळेस महाराष्ट्र शासन किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवरही माहीती उपलब्ध आहे.. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया ही अधिकृत शासकीय जाहिरातींद्वारे होते, जी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (उदा.nhm.maharashtra.gov.in किंवा maharashtra.gov.in ) प्रकाशित केल्या जातात. NHM अंतर्गत पद भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास, या अधिकृत वेबसाइट्स तपासावी. 
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत होणाऱ्या सर्व पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांनी फक्त महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (उदा. phd.maharashtra.gov.in ) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (NHM) अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी. आमिषे देणाऱ्या व्यक्तीपासून सावध रहावे. NHM मध्ये नोकरीची हमी किंवा अवास्तव वेतन देण्याचे वचन देणाऱ्या व्यक्तीपासून सावध रहावे
नोकरीच्या अटी आणि शर्ती तपासणे खूप आवश्यक आहे. गडचिराेली जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱी म्हणून नियुक्ती दिली जाणार असल्याने अनेक उमेदवारांची फसवणूक होणार आहे.  या गंभीर बाबीकडे गडचिराेली परिषद आरोग्य प्रशासनाने  तसेच जिल्हा प्रशासनाने पराकोटीने  लक्ष देण्याची गरज आहे. धानोरा येथे  कार्यरत असलेल्या  एका कर्मचाऱ्यांस  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी खास आपल्या कार्यालयात बोलावून घेतले असल्याचीही  चर्चा आहे
आणि तो DHO यांच्या सांगण्यानुसार  वसुली करणारा  स्पेशल  कर्मचारी असल्याचीही चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.
गोकुळनगर परिसरातील शिवाजी कॉलेजच्या मागे त्याचं घर असुन
त्यांच्या घरी जिल्हा परिषद अंतर्गत हॉस्पिटल सुरू आहे. आणि प्रति महीना 50 हजार रुपये घर भाडे घेत आहे.मात्र  तो धानोरा येथे जात नाही. असे सांगितले जात आहे.   आरोग्य विभागात नेमके किती आणि कोणकोणत्या प्रकारचे  गौडबंगाल होत आहेत याचा शोध वरिष्ठ अधिकारी घेतील काय?? की वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकरणात  हिस्सेदार ठरणार आहेत ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या