चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा:-आर्वी वर्षावासानिमित्त आर्वी शहरातील रोशन सेलिब्रेशन हॉल वर्धा रोड येथे वर्षावासाच्या पावन पर्वा निमित्त थायलंड येथील धुतांगधारी भंतेजी दाओदिन महास्थवीर यांचे धम्म प्रवचन दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोज रविवारला दुपारी १.०० एक वाजता आयोजित करण्यात आले आहे.
वर्षावास हा बुद्ध धम्मात फार महत्त्वाचा काळ मानला जातो.
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत धम्म अभ्यास करून धम्म जीवन अनुभवात धम्म श्रवण करण्याचा हा काळ असतो या काळात
धुतांगधारी भंतेजी दाओदिन महास्थवीर यांचे धम्म प्रवचन आर्वी शहरात आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान धम्म प्रचारक सुरेश भिवगडे आर्वी यांनी केले आहे.


0 टिप्पण्या