Ticker

6/recent/ticker-posts

जिजामाता महिला गृह उद्योग सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील नुकतेच जिजामाता महिला गृहउद्योग सहकारी संस्था भद्रावती र नं -- 241 या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण आमसभा 2024 -- 2025 संस्थेचे कार्यालय भद्रावती दुपारी एक वाजता पार पडली 

या सभेचे अध्यक्ष सुषमा श्रीनिवास शिंदे संस्थेचे अध्यक्ष हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सुषमा श्रीनिवास शिंदे,वंदना राजू  
गैनवार,शारदा पंजाब शिंदे, चंद्रकला पारोधे,सुंनदा वामन शिंदे इत्यादी गणमान्य व्यक्ती मंचावर उपस्थित होते. 
सर्व पाहुण्यानंचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले. 
संस्थेचे अहवाल वाचन सुषमा शिंदे यांनी केले. 
*सभेचे विषय : --* 

1 ) मागील आमसभा कार्यवाही वाचून कायम करणे 
2 ) सन 2024 -- 2025 चे वार्षिक हिशोबाची पत्रके ( जमाखर्च - व्यापारी पत्रक - नफातोटा पत्रक व ताळेबंद ) वाचून मंजूर करणे 
3 ) संस्थेचे सन 2025 -- 2026 चे अंदाज पत्रकास मंजुरी देणे 
4 ) संस्थेची बाहेरील कर्ज मर्यादा ठरविणे बाबत विचार करणे 
5 ) अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय असे इत्यादी अनेक विषय होते. 
सभेचे अध्यक्षीय भाषण करतांना संस्थेचे अध्यक्ष सुषमा शिंदे म्हणाले कि राष्ट्रीय सहकार धोरण आखण्यात येईल असे सरकारनी सांगितले गेले खरे तर घटनेप्रमाणे सहकार हा त्या त्या राज्य सरकारचा अखत्यारीतील विषय आहे सहकार क्षेत्र अधिकाअधिक प्रमाणात केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणणे हे संघराज्याच्या स्पिरिटला शेद देणारे आहे एवढे करून देखील क्षेत्रासाठी फार तरतुदी देखील केलेल्या नाहीत आपला हा गृह उद्योग आहे सगळया सदस्यांनी गृह उद्योगाला गृहिनीनीं या कार्याला मदत केली पाहिजे या पासून बेरोजगार महिलांना रोजगार देण्याचे काम सुद्धा या संस्थे मार्फत केले जाते बिना सहकार नही उद्दार असे त्या म्हणाल्या 
संचालन व आभार प्रदर्शन वंदना 
गैनवार यांनी मानले या सभे करिता शांता बावणे, कृतिका इंगळे,कोमल गैनवार, शैला श्रीरगीरवार, प्रेमीला पिपंळकर, माधुरी राऊत, मंदा बोरकर, शिल्पा आगलावे व अनेक संस्थेचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या