Ticker

6/recent/ticker-posts

नागरिकांना भेडसाविनाऱ्या समस्यांना स्थानीक लोकप्रतिनिधि जवाबदार


भाजी मार्केटसाठी बांधलेली इमारत धुळखात

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  येथील नागरिकांना भेडसाविनाऱ्या समस्यांना प्रशासन जवाबदार नसुन स्थानिक निष्क्रिय लोकप्रतिनिधि जवाबदार असल्याचे नागरिकांत जोरदार चर्चा आहे.
   नगर परिषद भद्रावती वर गेल्या ३० वर्षापासुन एकाच पक्षाची एकहाती सत्ता आहे.एकच नगरसेवक जवळपास पंधरा पंधरा वर्ष निवडुन आलेले आहेत. पंधरा वर्षात वार्डाचा विकास करणे सहज शक्य होते.आजच्या घडीला प्रत्येक वार्डीत रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे रस्ते गड्डामय झाले आहेत.काही रस्ते पहिल्याच पावसात वाहुन गेले.अनेक रस्ते गड्डामय अवस्थेत आहे. सब्जी मंडीमध्ये लोकप्रतिनिधिंच्या सहमतीने करोडों रूपए खर्च करुन भाजी मार्केट साठी भली मोठी इमारत बांधली. तीच्यापासुन काहीही उत्पन्न मिळत नाही.इमारत धुळ खात पडुन आहे.या इमारती वर जेवढा ख़र्च झाला तो खर्च सथानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधित लोकप्रतिनिधि कडुन वसुल करायला पाहिजे.तसेच नगर परिषद वर जी जप्तीची कारवाई झाली होती, संबंधितांवर कारवाई करुन त्याचेही पैसे वसुल केले पाहिजे,असे सर्वत्र बोलल्या जात आहे.
    अलिकडेच बांधकाम विभागातर्फे बाजार वार्डात वडाचे झाडापासुन सिमेंटचा रस्ता बनविने सुरु आहे.त्याची लांबी कुठपर्यंत आहे,हे माहिती अधिकारातुनच समजेल असे वाटते.मे-२०२५ पर्यंत हा रस्ता धनंजय गुंडावार यांचे घरापर्यंतच तयार आहे,गट्टू बसविन्याचे नकाम अजुनही अपुर्ण आहे.पहिल्याच पावसात सिमेंट वाहुन गेले.रस्त्यावर गिट्टीचा बारीक चुरा वर आला आहे.
     तसेच गेल्या अनेक वर्षात डोलारा तलावाचे पाणी वस्तीत घुसुन लोकांचे संसार उघड्यावर पडत असते.लोकप्रतिनिधिंनी डोलारा तलावाचे सौंदर्यीकरणाच्या नावाखाली हा प्रश्न मुद्दाम सोडविला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या