Ticker

6/recent/ticker-posts

वणीत पार पडला अनेकांच्या उपस्थितीत गौरव पुरस्कार समारंभ !

सहज सुचलंच्या चंद्रपूर जिल्ह्यातील 5 महिला ठरल्या कर्तृत्ववान सन्मान पुरस्कारांच्या मानकरी ! 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपुर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी चिखलगाव येथील ज्ञान बहुउद्देशीय शिक्षण विकास मंडळाच्या वतीने शुक्रवार दि.5 सप्टेंबरला शिक्षकदिनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या पाच महिलांना  मान्यवरांच्या उपस्थितीत महिला कर्तृत्ववान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यात प्रामुख्याने राजूराच्या जेष्ठ साहित्यिक तथा आदर्श शिक्षिका अधिवक्ता मेघा धोटे, समाजसेविका तथा चंद्रपूरच्या सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक , सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, चंद्रपूरच्या योगशिक्षिका तथा नामवंत कवयित्री वैजयंती गहुकर व वाचक वर्गात लोकप्रिय ठरलेल्या लोकप्रिय ठरलेल्या सुवर्ण भारत न्यूज चॅनलच्या चंद्रपूर शहर प्रतिनिधी कु.प्रियंका गायकवाड यांचा समावेश होता.
हा सत्कार सोहळा वणी येथील वसंत जिनिंग हाॅल मध्ये दुपारी 12 वाजता अतिशय उत्साहात व थाटात पार पडला.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानसाधना कविता संग्रहाचे प्रकाशन ,पहिले विदर्भस्तरीय काव्य संमेलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा,व राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
उपरोक्त  कार्यक्रमाला प्रामुख्याने अधिवक्ता संतोष भादिकर, श्रीमती रजनी प्रल्हाद पोयाम ,राजेंद्र भादिकर,नारायण गोडे ,मारोती पेंदोर, सुभाष डोंगरे यांची उपस्थिती लाभली होती.
कवयित्री अधिवक्ता मेघा धोटे,वैजयंती गहुकर,व शैला चिमड्यालवार यांनी कविसंमेलनात भाग घेवून काव्यसंमेलनाची रंगत अधिकच वाढवली. उशिरा पर्यंत चाललेल्या कविसंमेलनात कवी व कवयित्रींना उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अधून मधून याच सभागृहात टाळ्यांचा देखील पाऊस पडला.नागपूरच्या समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप सुरु असून यापूर्वी  देखील याच गृपवरील अनेक कर्तृत्ववान महिला व तरुणी आपल्या उल्लेखनीय व अतुलनीय कामगिरीसाठी पुरस्कृत झाल्या होत्या.अशी माहिती खूद्द मायाताई कोसरे यांनी या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवरुन बोलताना दिली.
विशेष म्हणजे  दत्तात्रय समर्थ व अर्चना समर्थ यांनी मूल नगरीच्या पत्रकार भवनात लोकहितच्या वतीने गत वर्षी आयोजित केलेल्या एका   कार्यक्रमात सहज सुचलंच्या तब्बल तेरा कर्तृत्ववान महिलांना सन्मान पुरस्कार देऊन गौरविले होते.
याच पुरस्कार समारंभाला राज्यातील सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार, चंदा कामडी, समता बन्सोड,अर्चना,चावरे, पूनम मडावी, स्नेहा मडावी, चैताली आतराम,पोर्णिमा किर्तीवार, अधिवक्ता हिमानी वाकुडकर यांच्यासह अनेक जेष्ठ व नवोदित महिलांची उपस्थिती लाभली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या