चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेज शहापूर च्या वतीने मा. डॉ. प्रल्हाद हरडे (प्रिन्सिपल)यांच्या मार्गदर्शनात प्रमुख योगशिक्षक श्री शाम कुकडे यांनी आपल्या ८२ वर्षाच्या या वयात ही अत्यंत सक्रियतेने योगासन, प्रणायाम, १२ योगिक_ जॉगिंग चे प्रात्यक्षिक, आहार _विहार, दिनचर्या ,ध्यान_धारणा, वक्तशीरपणा ,व्यसनमुक्त, आसन, प्राणायाम ध्यान _समाधी इत्यादी चे इंजीनियरिंग च्या मुलांना धडे गिरविले व योग्य ते मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पाहुणे म्हणून मा. अतुलजी वर्मा, मोहम्मद सईद शेख मंचावर उपस्थित होते.सोबतच कॉलेजचे को _ऑर्डिनेटर प्रा.योगेश शेंडे, डॉ.शाहीद अख्तर शेख (एचओडी_ सिविल), प्रा. दिपाली ईश्वरकर, प्रो. शीतल गबने ,प्रा रमेश देशमुख इत्यादी सह मोठ्या संख्येने मुले_ मुली उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रो. शितल गभने यांनी केले.


0 टिप्पण्या