चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे :-इंदापूर तालुका कलाध्यापक संघ व पुणे जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या वतीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना कला शिक्षक पदे ही पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत भरण्यासाठीजिल्हा कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष महेश मोरे यांनी निवेदन दिले. कलाध्यापक संघाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,राज्य शिक्षण आयुक्त व शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले.यावेळी पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षा अश्विनी कदम,पुणे जिल्हा कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष महेश मोरे कोषाध्यक्षा निताली हरगुडे,सहसचिव बापूराव कदम,सदस्य मनोज शिंदे, प्रमोद धापटे, सायली देशमुख, दीपाली फुंदे आदी उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरण (NEP) नुसार, कला विषयाला खूप महत्व दिलेले आहे,शासन स्तरावरून कला विषयाला नेहमीच डावलले गेलेले आहे. सन २०१२ पासून कला शिक्षक भरती झाली नाही.राज्यातील अनेक शाळांमध्ये कलाशिक्षक नसल्याने मुलांना कला विषय शिकवणार कोण? कलेमुळे मुलांच्या सृजनशिलतेला प्राधान्य मिळते.मुलांचा कौशल्यात्मक विकास उत्तम प्रकारे घडतो.महाराष्ट्र शासन व कला शिक्षण मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षी शासकीय रेखाकला परीक्षा नियमित पणे घेतल्या जातात.त्यामधून सुद्धा अनेक विध्यार्थी ही बालवयापासूनच कला क्षेत्रात करियर करायची मुहूर्तमेढ रोवत असतात.पण तरीही शासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
नुकत्याच झालेल्या पवित्र पोर्टल २०२४ ,टप्पा -२ मध्ये ही ,कला शिक्षक भरतीची पदे ही सदर पवित्र पोर्टल मध्ये दिलेली नव्हती.पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२५ टप्पा -३ मध्ये यावर्षी कला शिक्षक पदे पोर्टल मार्फत व कायम स्वरूपी भरावीत अशी मागणी निवदेनात करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या