Ticker

6/recent/ticker-posts

कामारी पोटा गटात अशोकराव शिरपुले यांच्या मातोश्री सुलोचनाबाई उत्तमराव शिरफुले यांचे पारडे जड..!जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सेवाभावी कार्यामुळे वाढला विश्वास..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :-कामारी पोटा गटातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये नवे वारे वाहू लागले आहेत. या गटात मातोश्री सुलोचनाबाई उत्तमराव शिरफुले या इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येताच, ग्रामस्थ आणि मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच कामारी अशोकराव पाटील शिरफुले यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली मातोश्री सुलोचनाबाई यांनी अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय भूमिका निभावली आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची प्रतिमा सेवाभावी, लोकाभिमुख आणि प्रामाणिक नेतृत्वाची म्हणून उभी राहिली आहे.
गावोगावी महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सुलोचनाबाई यांना मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता, कामारी पोटा गटात त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यांचा साधा स्वभाव, सर्वांसाठी समान दृष्टी आणि लोकांशी आपुलकीने वागण्याची शैली यामुळे त्यांना “गावकऱ्यांच्या मनातील मातृसमान व्यक्तिमत्व” म्हणून ओळख मिळत आहे.
सध्या संपूर्ण गटात सुलोचनाबाई यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात “या वेळेस शिरफुले यांचे पारडे जड!” अशी चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या