Ticker

6/recent/ticker-posts

हिवताप कर्मचाऱ्यांचा राज्याचा लढवैय्या राजाराम सोनार


विमोह त्यागून कर्म फळांचा सिद्ध होईल पार्थ

कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-सन्माननीय  श्री आर एन. सोनार साहेब यांचा जन्मदिवस २७ ऑक्टोबर १९५२ आहे.आज रोजी ते ७३ व्या  वर्षांमधून ७४ व्या वर्षात  पदार्पण करीत आहेत. हा केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नाही तर एका तपस्वी जीवनाचा, अथक परिश्रमाचा आणि कर्मचाऱ्यांसाठी व समाजासाठी दिलेला योगदानाचा गौरवशाली क्षण आहे. त्यांचे आयुष्य संघर्षमय समर्पण आणि यश यांचा संगम आहे. या त्रीगुणांचा संगम म्हणजेच राजवाड्याचे वास्तुपुजन,चारधामा नंतरचे गंगापुजन आणि वाढदिवस. काय योग घडवून आला. हा खरोखरच यशस्वी जीवनाचा खरा अर्थ आहे. 


त्यांनी आपले सुरुवातीचे जीवनात अनेक आव्हानांना तोंड दिले. परंतु प्रत्येक वेळी दृढनिश्चयाने त्यावर मात केली. त्यांचा जीवनाचा प्रत्येक टप्पा हा त्यांच्या कठोर मेहनतीचा आणि हार न मानण्याच्या वृत्तीचे साक्षी देतो. आपले सेवा कार्य सांभाळुन  कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची आपली जिद्द कायम ठेवली. त्यांनी हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि गरजू लोकांना मदतीचा हात दिला त्यांच्या या कार्यामुळे त्यांना हिवताप विभागामध्ये तसेच समाजामध्ये एक आदराचे स्थान मिळाले आहे.   सकारात्मक दृष्टिकोन आणि हसतमुख चेहरा नेहमी इतरांना प्रेरणा देतो. आजही ते ज्ञानाची उपासना करतात आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतात. श्री राजाराम सोनार यांचा ७३ वर्षाचा जीवनप्रवास हा एक आदर्श आहे .  प्रामाणिकपणा कठोर परिश्रम आणि  आपल्या कार्याविषयी असलेली बांधिलकी या मूल्यावर आधारित जीवन कसे जगावे हे  त्याचेकडुन शिकण्यासारखे आहे.  कोणी चांगले म्हणावे म्हणून काम करण्यापेक्षा आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असेल तर ते काम आपण अवश्य करावे. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर  आपल्यावरील टीकेलाही काहीच अर्थ नसतो हीच विचारधारा स्वीकारून श्री आर. एन सोनार  साहेबांनी संघटनेसाठी काम केले आहे माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती असल्याने अनेक माणसे जोडली आहेत एखादी व्यक्ती मोठी होऊन नावारूपाला येते तेव्हा त्याचे मागे त्या व्यक्तीचे  नशीब इतकाच भाग नसतो त्याचे कारण त्याचे अंगी असलेली अनेक चांगले गुण जिद्द ,त्याची बुद्धिमत्ता या सर्व गोष्टी जेव्हा पणाला लागतात, तन-मन-धनाने तो जेव्हा सर्वस्व  अर्पण करतो त्यावेळेच मग नशीब सुद्धा त्याला साथ देते आणि त्या व्यक्तीला मानसन्मान प्राप्त होतो. अशाच तालमीतील ज्यांनी गेल्या ५०  वर्षापासून संघटना, सामाजिक चळवळ,  ज्येष्ठ नागरिकांचे सोयी सुविधा साठी सदैव तत्पर असलेले लढवै नेते सन्माननीय राजाराम सोनार. त्यांचे कार्याचे हे सुवर्ण महोत्सवी वर्षे आहे.

जळगाव जिल्ह्यातील  पाचोरा   येथील रहिवासी आहेत.त्यांचे शिक्षण पाचोरा येथेच  झाले. घरची परिस्थिती जेमतेम.आजोबा स्वातंत्र्य संग्राम सैनिक त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचा वसा लाभलेला आहे. आई वडिलांचे आशिर्वाद व आजोबांचे देशासाठी दिलेले बलिदान यामुळे हिवताप विभागामध्ये त्यांनी १९७७ मधे प्रवेश केला.  आपले कर्तव्य व जबाबदारीचे पालन करून प्रामाणिक पणे जनसेवा केली त्यामुळे त्यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले*
   

हिवताप कर्मचारी संघटनेचे भिष्मपितामह स्व दे. मा. जगताप यांचे प्रेरणेने त्यांनी संघटनेमध्ये प्रवेश केला.  २००१ मधे महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे ते  राज्याध्यक्ष झाले.    २००६ मी राज्य सरचिटणीस झाल्याने माझा त्याचेशी संबंध आला. नेमका त्याचवेळेस  खाजगीकरण व जागतिकीकरणातून अनेक प्रश्न निर्माण झाले.  महत्त्वाचे म्हणजे २००६  मध्ये हिवताप योजनेचे जिल्हा परिषदकडे हस्तांतरण प्रक्रियेमुळे हिवताप योजनेतील कर्मचार्यासमोर फार मोठे संकट उभे झाले. हा अन्याय दूर करण्यासाठी   राज्यात फार मोठा लढा उभा करावा लागला.  विभागातील सर्वागातील  गट अ पासून तर ड पर्यंतचे कर्मचारी एकत्र होऊन जिल्हा परिषद कडिल हस्तांतरण रोखण्यासाठी लढा उभारला.अर्थात हा संघर्ष सोपा नव्हता धरणे उपोषण  मोर्चे ,मंत्र्यांना, मुख्य सचिवांना घेराव हे सर्व  आंदोलने संघशक्तिचे नेतृत्वाखाली झाली.   आरोग्य विभागाचे  मुख्य सचिवाला  हिवताप योजनेचे वाटोळे करित असल्याचे भर सभेत सुनावण दिले.  सर्व सभागृह स्तब्ध झाला. आणि  संघ शक्तीला यश आले. सभेतुन बाहेर आल्यानंतर वारे शेर म्हणून त्यांची सर्वानी वाहवा केली. या संघटनेचे धुरंदर नेते  मा. र. गा. कर्णिक, दे. मा.जगताप ,न.गो वाणी, एस आर सपकाळे, बी एस कोऱ्हाळकर, पी. डी कोळपकर यांचे तालमीत तयार झालेल्या नेतृत्वाची  झुंजार नेता म्हणून ओळख झाली. 
तेव्हापासूनच  हिवताप योजनेमधे त्यांचा दरारा वाढला* त्यांचे नेतृत्वाखाली हिवताप योजनेतील  कर्मचार्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत.  खरोखरच त्यांचे कार्याला सलाम आहे.
  संघटनेचे कार्यासोबतच सकाळी पाच वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत सदैव आपल्या कार्यात ते  मग्न असतात.   श्री संत गजानन महाराजाचे ते परंम भक्त आहेत. सकाळी  उठल्यानंतर योगा, देवपूजा नंतर दैनंदिन कार्य अशी त्यांची दिनचर्या आहे.  एक मुलगा डॉक्टर दुसरा उद्योगपती आहे  धर्मपत्नी सौ लताबाईचे त्यांचे प्रगतीत फार मोठे योगदान आहे. कुंटुंबातील  मुले ,मुली, स्नुषा आणि नातवंडाची खूप मोठी साथ आहे.त्यामुळेच ते एवढ्या यशाचे शिखरावर पोहोचले आहेत.अशा या बहुआयामी कर्तृवान नेत्याला माझेकडुन व माझे परिवाराकडुन आणि विविध संघटना, संस्था व सर्व  वाढदिवसानिमित्त कोटी कोटी  शुभेच्छा! त्यांचे कार्याला प्रणाम या आनंदाचे दिवशी त्यांच्या  सर्व मनोकामना पुर्ण होवोत, यशात सिमा न राहता आयुष्यात सुखाचा वर्षाव, यश, समृद्धी आणि  भरभराटी लाभो,  सुख, समृद्धी आणि निरोगी उदंड आयुष्यासाठी अनंत शुभकामना!  श्री संत गजानन महाराजांची कृपा सदैव त्यांचे पाठीशी राहो अशी निर्मिकचरणी प्रार्थना शुभेच्छुक:- डी एस पवार सरचिटणीस महाराष्ट्र राज्य हिवताप निर्माण कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्य शाखा तथा निमंत्रक सरकारी  निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती तथा सरचिटणीस अमरावती जिल्हा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या