Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा युवा नेते सुहास वारे यांच्या वतीने मा. उपसरपंच अजित यादव यांच्या वाढदिवसा निमित्त सन्मान...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- डोणगाव ग्रामपंचायत चे मा. उपसरपंच अजित यादव यांच्या वाढदिवसा निमित्त भाजप युवा नेते सुहास वारे यांनी सकाळी नऊ च्या सुमारात डोणगाव ग्रामपंचायत समोर यादव यांचा सत्कार केला.
डोणगाव ग्रामपंचायत चे मा. उपसरपंच अजित यादव यांचे जवळा जिल्हा परिषद गटा मध्ये चांगले संघटन असल्याने त्याचेच अवचित्त साधून अजित यादव यांचा वाढदिवस साजरा केला असल्याचे समजते.
      सुहास वारे हे भाजपच्या तालुका स्तरावर काम करत असताना त्यांनी जामखेड तालुक्यातील  जिल्हा परिषद जवळागट व अरणगाव गणामध्ये  गावातील वाड्या वस्तीवर जाऊन मोठा जणसंपर्क वाढवला आहे.
      त्याचाच फायदा येत्या निवडणुकीला वारे यांना होणार असल्याचे समजते.
    त्यावेळी बोलताना ते म्हणाले कि, भाजपाकडून जामखेड पंचायत समिती साठी मी स्वतः इच्छुक आहे. 
        विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी देतील हा मला विश्वास आहे असे सांगितले.
       त्यावेळी भाजपा युवा नेते सुहास वारे, राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते सचिन डोंगरे, भाजपा सरचिटणीस पोपट जमदाडे, माजी सरपंच अर्जुन यादव, चेअरमन गणेश डोंगरे, राम पवळ, काकडे दाजी, शिवाजी यादव, अमोल यादव, रवी यादव, सुभाष यादव, माऊली साळवान,  किसन यादव, सोमनाथ दरे, विलास मोरे, दत्तात्रय गिरी, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या