Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना शिंदे गटाकडून 19 उमेदवारांची घोषणा; विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढणार – आकाश बाफना...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड शहराच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी नगरपरिषद निवडणूक 2025 जलद गतीने रंगतदार होत आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पदासाठी पायल आकाश बाफना यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करत एकूण 19 उमेदवारांची पहिली यादी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
         यावेळी बोलताना आकाश बाफना यांनी सांगितले की, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. स्वप्नातील जामखेड उभारण्याचा आमचा संकल्प आहे.” त्यांनी आरोप केला की, विरोधकांनी दबाव व आमिषे दाखवून त्यांच्या सहा उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. तरीही सर्व 19 उमेदवार विजयी करण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
             तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने यांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा अशा प्रलंबित प्रश्नांची ब्लूप्रिंट तयार करून ती उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकार परिषदेला सर्व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या