Ticker

6/recent/ticker-posts

जनजाती गौरव पंधरवडा कार्यक्रम संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : स्थानिक यशवंतराव शिंदे .उ. प्राथमिक विद्यालय भंगाराम वार्ड भद्रावती येथे जनजाती गौरव पंधरवडा, पं. जवाहरलाल नेहरू जयंती तसेच आपत्ती व्यवस्थापन याबाबत विद्यार्थी सुरक्षा तसेच सखी सावित्री बैठक घेण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक  डॉ.प्रा विशाल निळकंठराव शिंदे (सहसचिव ) , डॉ. सुधिर मोते प्राचार्य व कु. दीपकांता लभाने  समुपदेशक (पोलिस स्टेशन) भद्रावती, राजू गैनवार माजी नगरसेवक - आदिवासी समाज कार्यकर्ता  संदिप पेंदाम, ताजने  (मुख्याध्यापक) व शाळेच्या मुख्याध्यापिका  पपिया जितेंद्र बिश्वास यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. 
कार्यक्रमाचे विशेष अतिथी आदिवासी समाजातिल समाज कार्यकर्ता संदिप पेंदाम यांनी पारंपरिक वस्तू गोंड कालीन नाणी, शिंगी (शिंग), देवबाण, पैंजण, देवखंजर या जुन्या पारंपरिक वस्तू कलेचा परिचय विद्यार्थ्यांना तसेच समाजबांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिले. 
भगवान बिरसा मुंडा यांना सन्मानपूर्वक आदरांजली वाहिली तसेच शाळेतील बालगोपालांनी गोंडी नृत्य आणि मित नैताम यांनी गोंडी भाषेत गाणे सादर केले. तसेच जानवी शेंडे, उन्नती कन्नाके, रिया जथाडे, योगिनी मेहरे व पुर्वी गैनवार
या विद्यार्थांनी गोंडीनृत्य सादर केले. अश्लेष चव्हाण, रावी कुमरे, योगिनी मेहरे, दृष्टी वाणी, शुब्राज कडाम या विद्यार्थांनी गोंडी वेशभूषा करून या कार्यक्रमात आपल्यात असलेले कला या कार्यक्रमात सादर केले.
उपस्थित मान्यवर मोते सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले.दीपकांता लभाने  यांनी मुलांना आपल्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. धिरज ताजने सर यांनी 14 नोव्हेंबर बालदिनाच्या मुलांना शुभेच्छा दिले.राजू गैणवार यांनीसुद्धा मुलांना बिरसा मुंडा यांच्या जीवनावर अधिक प्रकाश टाकत शाळेतील विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उदघाटक मा. डॉ. विशाल शिंदे  यांनी अध्यक्षीय भाषणातून बिरसा मुंडा यांच्या जीवनावर अधिक प्रकाश टाकत शाळेतील विद्यार्थांना मोलाचे असे मार्गदर्शन केले.
शाळेतील मुख्याध्यापिका सौ. विश्वास मॅडम यांनी प्रास्ताविक भाषणातून शाळेत उपलब्ध असलेले अनेक सोय सुविधा तसेच शाळेत होत असलेल्या विशेष वर्गाची माहिती उपस्थित समाज बांधवांना तसेच पालकांना दिली. कार्यक्रमाचे संचालन शाळेतील सहायक शिक्षक रवी मडावी यांनी केले. या कार्यक्रमाला आत्राम - ज्ञानेश्वर घोरुडे - प्रीती मेश्राम, नेहा सिडाम, सुषमा गेडाम व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची पालकांची तसेच वार्डातील समस्थ नागरिकांची उपस्थिती लाभली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या