चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-शरीर निरोगी,सक्रीय व मजबूत राहण्यासाठी संतुलित आहार_विहार गरजेचे आहे.संतुलित आहाराचे अनेक फायदे असून ज्यामुळे रोग प्रतिबंधक शक्ती सुधारते,मधुमेह,हृदयविकार, उच्च रक्तदाब सारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो,शरीरास आवश्यक ऊर्जा मिळते,पचनक्रिया सुधारते आणि मानसिक आरोग्यालाही फायदा होतो.भूक लागल्याशिवाय जेवण करू नये, नऊ तासांचे अंतर ठेवावे.सूर्यास्ताच्या आधी जेवण करावे त्या दरम्यान खाद्य,तरल पदार्थ , अँसिडयुक्त आहार टाळावे,कच्चे फळे, पाले _भाज्या ,ऋतुमानाप्रमाणे तयार होणारे फळे घ्यायचे त्यामुळे आपले आरोग्य सुधारू शकते, दर रोज निरोगी अन्न खाणे हे निरोगी जीवन जगण्याची पहिली पायरी आहे.आहार_विहार वर ज्येष्ठ नागरिकांना
दादा फुंडे योग शिक्षक, सामा.कार्यकर्ता वन औषधिय फार्महाऊस,मोरगाव अर्जुनी हे योग्य मार्गदर्शन करीत होते.
ग्रामसेवा कॉलोनी,खात रोड येथील डॉ .मालविका वर्मा यांचे होम्यो व योगा क्लिनिक येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पतंजली भंडारा शाखा चे प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे,वामनराव गोंधुळे,आत्माराम बेदरकर,सईद शेख,अनिल शेंडे,पुरुषोत्तम समरीत, ई ची प्रामुख्याने उपस्थिती होती.अतुल वर्मा यांनी सर्वांचे आभार मानले.
मा. जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर


0 टिप्पण्या