सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
  
जामखेड:-  जामखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चर्चेत असलेला प्रभाग क्रमांक सहा मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड.डॉ.अरुण हौसराव जाधव व सौ संगीता रामचंद्र भालेराव गोरगरीब कष्टकरी जनतेच्या मनातील उमेदवार ठरले आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व मतदार जनतेच्या मनामध्ये आनंदाची उत्स्फूर्ति निर्माण झाली आहे...
         आज धर्मयोद्धा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्लॉक बीड रोड पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून गाजत वाजत महापुरुषांच्या घोषणा देत रॅली निघाली होती या रॅलीमध्ये जवळपास सहा नंबर वार्डामधील एक हजार मतदार बांधव महिला व पुरुष उपस्थित होते..
        तसेच कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव म्हणाले की घोडे आणि मैदान जवळ आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे मायबाप जनता येणाऱ्या दोन तारखेला दाखवून देणार आहे येणाऱ्या निवडणुकीस सामोरे जाताना मायबाप जनतेने घाबरून जाऊ नका मी तुमच्या पाठीशी भाऊ व तुमचा मुलगा म्हणून उभा आहे चिम्या गोम्या येईल तुम्हाला उलट सुलट सांगेन पैसे देईल त्याचे ऐकू नका आठ वर्षांपूर्वी हे कुठे गेले होते का उंदराच्या बिळात जाऊन बसले होते तुम्ही त्यांना विचारा आज वार्ड क्रमांक सहा मधील काय परिस्थिती आहे लाईट नाही पाणी नाही घरकुल नाही गटार नाही मच्छर डासाने अनेक लोक आजारी पडतात यावेळी हे कोठे गेले होते त्यांना जाब विचारा व मला तसेच संगीत भालेराव यांना येणाऱ्या दोन तारखेला मोठ्या मताच्या संख्येने  निवडून द्या मी तुमचा सेवक म्हणून काम करेल ...
       तसेच राष्ट्रीय काँग्रेस पार्टी वंचित बहुजन आघाडी शहर विकास आघाडीचे अधिकृत नगरअध्यक्ष उमेदवार जैनब वाहेद कुरेशी व नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल अंकुश उगले यांनी मनोगत व्यक्त केले तसेच लोक अधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ यांनी कुणाच्याही भूलथापेला बळी न पडता ॲड .डॉ.अरुण आबा जाधव व सौ संगीता रामचंद्र भालेराव यांना आपण मोठ्या संख्येच्या मतांनी निवडून द्यावे असे मायबाप जनतेस आव्हान केले यावेळी अनिल दादा पवार मच्छिंद्र जाधव शुभम जाधव संतोष पवार विशाल जाधव भिमराव चव्हाण अरविंद जाधव बाजीराव पवार अंकल घायतडक विशाल गायकवाड गोकुळ माने सागर समुद्र अतिश मेघडंबर जितेंद्र समुद्र गणेश घायतडक बाळासाहेब साठे मुकुंद घायतडक रणजीत मेघडंबर राम यादव बाळासाहेब भालेराव सचिन चव्हाण सुमित भालेराव पप्पू भालेराव ऋषिकेश गायकवाड रजनी बागवान ललिता पवार उपस्थित होते..