Ticker

6/recent/ticker-posts

मी सदैव लोकांच्या कामासाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता :- रा. काँ.ता. अध्यक्ष महेश निमोणकर...आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार :- प्रदेश युवती प्रदेशाध्यक्ष संद्याताई सोनवणे...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- निवडणुकीपुरता काम करणारा नाही तर जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारा मी कार्यकर्ता आहे जनतेच्या आशीर्वादाने व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी पत्नी सुवर्णा निमोणकर यांना नगराध्यक्ष पदासाठी तर नगरसेवक पदासाठी माझ्यासहित 11 सहकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीस सामोरे जात आहे.
       जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. 
          यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेश अध्यक्ष संध्याताई सोनवणे या उपस्थित होत्या. 
       निमोणकर बोलताना पुढे म्हणाले की, निवडून येताच जामखेडच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ते काम लवकरच पूर्ण करणार असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विकास पुरुष म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे त्यांच्या हातात महाराष्ट्राच्या अर्थमंत्री पदाच्या माध्यमातून तिजोरीची चावी आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरातील राहिलेली कामे निधी उपलब्ध करण्याच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. मी खऱ्या अर्थाने जनतेच्या आग्रहस्तव निवडणुकीला सामोरे जात आहे. 
        माझ्या प्रचार फेरीला मतदारांचा प्रत्येक प्रभागात जोरदार प्रतिसाद मिळत आहे, माझे सर्व जाती धर्मातील लोकांबरोबर सलोख्याचे संबंध आहेत, मी सदैव लोकांच्या कामासाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता आहे, तरी जामखेड शहरातील सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी सौ. सुवर्णा महेश निमोणकर व 11 उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून नगरसेवक पदाची संधी द्यावी असे कळकळीचे आवाहन त्यांनी जामखेड शहरातील मतदारांना केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या