चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-कोकळगाव ता.निलंगा येथील गरीब व मजुर १२महिलांभगीनींनी दिवाळी सणा दरम्यान मौजे.सरवडी(निलंगा) येथील रहिवाशी वरसूकेत मोतीराम मोहिते याच्या शेतात सोयाबीन पीक काढणीचे गुत्ते ५५ हजारा प्रमाणे ५ हजार बयाणा घेत फायनल ठरविले. पण नंतर माञ सदरचे काम अंगावर पडतेय.हे मजुरांच्या लक्षात आले. तसेच अन्य मजूर ही येईनात.म्हणुन हे गुत्ते आम्हाला परवडेना.तसेच हे काम सणापर्यंत शक्य नाही.तेंव्हा थोडीफार वाढीव मजुरी म्हणजे जसे काम,तसे दाम द्या.अशी नम्र विनंती बिच्चा-या मजुर महिलांनी केली.पण शेत मालकानी जादा दाम मिळणार नाही.ठरलेल्या दामात करायचे तर काम करा.नाही तर राना बाहेर जाऊ शकता.अशी मुजोरपणाची भाषा वापरली.म्हणुन त्या महिला मजुर भगीनींनी जेवढे काम केले.त्याचे ठरल्याप्रमाणेच ५ हजार बयाणाचे वजा करुन शिल्लकीचे २५ हजार येणे आहे ते द्या.अशी विनंती मजुर माऊल्यांनी केली तरीही तो मुजोर शेतकरी शिल्लक दाम देण्याचे तर दुरच.उलट तुम्हाला कुठे जायचे तिथे जावा.मी इतरांना कितीही रुपै देईन ! पण तुम्हाला यापुढे १ फुटकी कवडी ही देणार नाही.अशी धमकी देतोय. या सर्व मजुर भगीनींचे हातावर पोट आहे.तेंव्हा सोयाबीनचे गुत्ते घेतलेले गरीब मजुर महिलांचेच आर्थिक गुत्ते काढणा-या मुजोर शेतक-यांना न्याय मिळवून देणार कोण?याकडे समस्त गावचे लक्ष लागले आहे.