चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-प्रगती महिला समाज संस्था,भंडारा द्वारा संचालित प्रगती महिला कला महाविद्यालयात,
महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. प्रशांतजी देशकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांच्या मार्गदर्शनात क्रांतिसूर्य महत्मा जोतिबा फुले यांना १३५ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मराठी विभाग प्रमुख डॉ. जयश्री संजय सातोकर त्यांनी जोतिरावांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना महात्मा या पदवीने कसे गौरविण्यात आले याचा आढावा घेतला. कु. सोनिया मेश्राम या विद्यार्थिनीने जोतीबांचे जीवनचरित्र सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक इतिहास विभाग प्रमुख डॉ. गजानन कळंबे यांनी कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. शालिक राठोड, डॉ. डी. डी. चौधरी, प्रा. पी. एस. देशमुख, डॉ. शिल्पा बन्सोड, डॉ. ज्योत्स्ना गजभिये, प्रा. शुभांगी लोंदासे, श्री. संजय वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या