चित्रा न्युज प्रतिनिधी 
हिंगोली :-वसमत तालुक्यातील गिरगाव येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत स्थानिक हुतात्मा बहीर्जी माध्यमिक विदयालयात आज 26 नोव्हेंबर रोजी संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भिम आर्मी एकता मिशनचे हिंगोली जिल्हा प्रमुख माननीय मास्टर महेंद्र गायकवाड, तर तसेच हिंगोली जिल्हा सचिव मा किशन खरे, तसेच भिम आर्मी मार्गदर्शक माननीय कैलास कुंटे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलं. तर यावेळी संविधानाची महत्त्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय शंकरराव कऱ्हाळे यांनी संविधान दिनाचे महत्व पटवून देत ते म्हणाले की, संविधानात विषमता नष्ट करण्याची ताकद या भारतीय लोकशाही संविधानात आहे अस मनोगत त्यांनी यावेळी कार्यक्रम प्रसंगी वक्तव्य केलं. 
तर यावेळी तसेच शंकर भाई कऱ्हाळे यांनी देखील बोलतांना संविधान म्हणजे काय याच देखील महत्व विद्यार्थांना मनोगत करतांना व्यक्त, तर यावेळी भीम आर्मी हिंगोली जिल्हा अध्यक्ष मास्टर महेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक करत सांगीतले की, विद्यार्थांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, आणि जो बाबासाहेबांनी दिलेला मोलाचा मंत्र म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या वाक्यच गांभीर्य लक्षात घेऊन विदयार्थांनी मोबाईल फोन पासुन लांबच रहावं..
अस देखील वक्तव्य त्यांनी या प्रसंगी बोलतांना केलं तर यावेळी शिक्षकवर्ग व मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थांना वही व पेन वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रथमता भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या पुतळ्यास व विश्ववंदनीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, मूल्ये, नागरिक कर्तव्ये यांची माहिती देत लोकशाहीची पायाभरणी किती भक्कम आहे याचे मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानातील प्रस्तावना सामूहिकरित्या वाचून दाखवली. तर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लोकतंत्राच्या रक्षणात शिक्षणाची भूमिका स्पष्ट केली. समाजात जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये व मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

वही-पेन वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद ओसंडून वाहत होता. तर यावेळी भिम आर्मी जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड, शालेय समितीचे अध्यक्ष तथा सोसायटी चेअरमन शंकरराव कऱ्हाळे, माजी सरपंच बाबाराव कऱ्हाळे,   सामाजिक कार्यकर्ते शंकर भाई कऱ्हाळे, जिल्हा सचिव किशन खरे, मार्गदर्शक कैलास कुंटे, सामाजिक कार्यकर्ते वसंत सुर्यवंशी, साहेबराव अन्नपुर्वे, पत्रकार रवि कुंटे, बबन उराडे, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मस्के सरांनी केले व आभार प्रदर्शन राऊत सर यांनी केले, तर यावेळी हुतात्मा बहीर्जी स्मारक विदयालयाच्या वतीने आलेल्या सर्व सन्मानीय मान्यवरांचे व उपस्थितांचे शब्द सुमने आभार मानले.