Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मा.खासदार व पक्ष निरीक्षक सदाशिव लोखंडे यांच्या एन्ट्रीने आली रंगत;पायलताई आकाश बाफना शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जाहीर...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगरपरिषद निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी मध्ये जागावाटपात समाधान न झाल्याने शिवसेना धनुष्यबाण सर्वच्या सर्व जागा लढविणार असे आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. 
      आकाश बाफना यांनी परवा शिवसेनेत प्रवेश केला आणि काल जामखेड मध्ये पक्ष निरीक्षक मा. खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेत सर्वच्या सर्व जागा लढविणार असे जाहीर केले व एकदिलाने काम करून जामखेड नगर परिषदेवर भगवा फडकवणार आणि एकनाथ शिंदे साहेबांची मान उंचावणार असे सांगितले.
        जामखेड येथे पक्ष निरीक्षक सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले,सातपुते,तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने,युवा प्रमुख प्रविण बोलभट,देविदास भादलकर,नितीन कोल्हे,संतोष वाळुंजकर,बब्रुवान वाळुंजकर,शिवकुमार डोंगरे,समुद्र यांच्या सह जिल्ह्यातील तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.
           यावेळी जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणाले की,आम्ही युतीसाठी खुप प्रयत्न केला पण भाजपाकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे आम्ही स्वतंत्र सर्वच्या सर्व जागा लढविणार आहोत. आम्ही सर्व जण एकत्र प्रयत्न करणार आहोत आणि चांगले यश मिळवणार आमच्यात कसलाही बेबनाव नाही असा विश्वास व्यक्त केला.जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली असून तरुणांचा आयडॉल म्हणून ओळखले जाणारे आकाश बाफना यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे जामखेडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा भूकंप झाल्याची चर्चा वर्तुळात आहे.
           शिंदे गटाने जामखेड नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने कोणाला फटका बसेल,कोणाचे गणित बिघडेल, यावर वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.आकाश बाफना यांच्या प्रवेशासोबत काही विद्यमान नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला असून आणखी काही नगरसेवक लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.राज्यात महायुतीचे सरकार असले तरी काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली जात आहे. 
       जामखेडमध्ये मात्र महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही स्वतंत्ररीत्या लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.आतापर्यंत जामखेडचे राजकारण सभापती प्रा.राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या भोवती फिरताना दिसत होते.मात्र  बाफना यांनी चार महिन्यांपूर्वीच सुरू केली तयारी - आकाश बाफना यांनी काही महिन्यांपूर्वीच मैदानावर उतरून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावली आहेत.मुरमीकरण केले,वीज, पाणीप्रश्न सोडविला त्यांनी केलेला सक्रिय जनसंपर्क,तरुणांमधील लोकप्रियता आणि विविध उपक्रमांमुळे त्यांची ओळख अधिक बळकट झाली.त्यामुळे त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे जामखेड नगरपरिषद निवडणुकीत नवीन उत्सुकता,नवी स्पर्धा आणि तुफान रंगत निर्माण झाली असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या