Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा सायबर पोलिस तर्फे सायबर क्राईम बाबत जनजागृती अंतर्गत मुस्लिम लायब्ररी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-सायबर गुन्हे संबंधित सोशल मीडिया द्वारे कशी फसवणूक, केली जाते या बाबत सावध कसे राहावे या बद्दल भंडारा सायबर पोलिस विभाग कडून जनजागृती करण्यात येत आहे.
नुकतेच मुस्लिम लायब्ररी येथे येणारे  विद्यार्थी_विद्यार्थिनी,नागरिकांना सोशल मीडिया कङून,खोट्या संदेश्या द्वारे,कस्टम_गिफ्ट फ्रॉड, एप्लीकेशन फ्रॉड,OLX फ्रॉड, वॉट्सएप ऑफ वीडियो कॉल/सेक्स्टोर्शन, शेयर मार्केट,ट्रेडिंग_फ्रॉड, पीएम किसान,लाडली बहिण योजनेचा नावाने  फसवणूक,कस्टमर केअर फ्रॉड, KYC फ्रॉड, लॉटरी फ्रॉड, लोन, अमेजॉन फ्रॉड,ई बाबत फसवणूक कशी केली जाते या बद्दल साइबर पोलिस विभागाचे सहायक पो.निरीक्षक नीरज साबळे, पो.हवालदार सागर रहिले यांनी या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले आणि सायबर गुन्हे संबंधित तक्रार गृह मंत्रालय यांच्या राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग वर नोंद करावे ,सायबर स्मार्ट बना सुरक्षित रहा! असे आहवान ही करण्यात आले.या प्रसंगी ग्रिन हेरिटेज चे मो.सईदभाई शेख, सहाय्यक ग्रंथपाल सय्यद सोहेल अली,सुरेश वंजारी आणि कॉम्पटेटिव एग्जाम चे विद्यार्थी,विद्यार्थिनी,वाचक ई उपस्थित होते।


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या