Ticker

6/recent/ticker-posts

जामखेडमधील प्रचार सभेत विधान परिषद सभागृह, सभापती आणि परिषदेच्या आमदारांविरूद्ध अवमानकारक वक्तव्य; सूर्यकांत हौसराव मोरे यांना हक्कभंगाची नोटीस...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेडमधील प्रचार सभेत विधान परिषद सभागृह, सभापती आणि परिषदेच्या आमदारांविरूद्ध अवमानकारक वक्तव्य केलेबद्दल सूर्यकांत हौसराव मोरे (रा. रत्नापूर, ता. जामखेड) यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी दिलेल्या सूचनेवरून विधान मंडळाच्या अवर सचिव संगीता विधाते यांनी ही नोटीस पाठविली आहे. यावर दि. २ डिसेंबरपर्यंत खुलासा करण्यासाठी मोरे यांना मुदत. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासमोर सुनावणी होणार नाही.
       दि. २३ नोव्हेंबर रोजी जामखेड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत सूर्यकांत मोरे यांनी सभापती शिंदे यांच्यावर टीका करताना संपूर्ण सभागृह आणि आमदारांचाही अवमान केला. 
        खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे स्टेजवर असताना हा प्रकार झाला. याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार दरेकर आणि भारतीय यांनी यासंबंधी विशेषाधिकार भंगाची सूचना मांडली. त्यानुसार पुढील कारवाई सुरू झाली आहे. आमदार दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. मोरे यांच्यासोबतच स्टेजवर बसलेले लोकप्रतिनिधींनाही दरेकर यांनी जबाबदार धरत सभागृहात अवमान केला जात असताना मोरे यांना रोखले का नाही, असा सवाल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या