चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल भद्रावती प्रखंड यांच्या वतीने कारसेवक व हुतात्मा दिनानिमित्त दोन सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजातील नागरिकांमध्ये आरोग्य, राष्ट्रप्रेम आणि व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पहिला उपक्रम कारसेवक व हुतात्मा दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर शनिवार दि.15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हुतात्मा स्मारक, भद्रावती येथे पार पडणार आहे. या शिबिराचा उद्देश समाजोपयोगी कार्य करणे तसेच गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देणे हा आहे.
दुसरा उपक्रम म्हणजे ‘भव्य मॅरेथॉन रॅली (Run for Health, नशा मुक्त भारत)’, ही रॅली रविवार, दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता हुतात्मा स्मारकाजवळील स्व. बाळासाहेब ठाकरे गेट येथून सुरू होऊन नागमंदिर देवस्थान, भद्रावती येथे समाप्त होईल. “जन-जन का एक ही नारा… नशा मुक्त हो देश हमारा!” या घोषवाक्याने शहरातील नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.
या दोन्ही उपक्रमांसाठी सार्वजनिक स्थळांचा वापर होणार असून, कार्यक्रम शिस्तबद्ध व शांततेत पार पडतील, असे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजक विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्रखंड भद्रावती यांच्यासह स्थानिक हिंदू समाजाने केले असून, सर्व नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या