चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : दिनांक १२/११/२०२५ ला प्रभू सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी रमेश हनुमंते, अरुण मांडवकर, सचिन नक्षीने, प्रशांत वाटेकर, भाऊराव येसेकर, प्रेमलाल कडुकर, दीपक मांडवकर आणि सर्व टीम यांनी चंद्रपुर येथील भावेश राजू बनसोड यांचे निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ व 2100 रुपयांची छोटीशी मदत करून सत्कार करण्यात आला.
ग्रीक _रोमन विभागात सुवर्णपदक प्राप्त...! राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड नुकत्याच संपन्न झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय खापोली जिल्हा रायगड येथे आयोजित 17 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये 51 किलो वजन गटात ग्रीको _रोमन विभागात यांनी सुवर्णपदक प्राप्त करून महाराष्ट्र संघातून त्यांची 69 वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संपूर्ण प्रभु सेवा संस्था व संपूर्ण टीम यांच्याकडून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या