Ticker

6/recent/ticker-posts

तळोधी (बा.) येथे संत नगाजी महाराज व संत सेनाजी महाराज मंदिर बांधकामाचे भुमिपुजन सोहळा संप्पन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती / चंद्रपुर : मौजा तळोधी (बा) येथे तळोधी युवा नाभिक बहुउद्देशिय संस्था व नाभिक युवा आघाडी तळोधी (बा) यांच्या संयुक्त वतिने नामदेवराव गुरनुले ले- ऑऊट वाढोना बायपास तळोधी (बा) नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज व श्री संत  सेनाजी महाराज मंदिर बांधकामाचे भुमिपुजन सोहळा दिनांक १ नोहेंबर २०२५ रोज शनिवारला संप्पन्न झाले.
सदर मंदिराच्या बांधकामाचे भुमिपुपन  राजेश भगवानजी घिये उपसरपंच ग्रामपंचायत तळोधी (बा) तथा संचालक कृ. ऊ. बाजार समिती नागभिड   नामदेवराव गुरनुले लेऑउट मालक तळोधी (बा) , सौरभ गिरडकर अध्यक्ष श्री गुरुदेव कला मंच तळोधी (बा) यांचे शुभहस्ते करण्यात आले. भुमिपुजनानंतर लगेच मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे प्रास्ताविक श्रीमती वैशालीताई भंडारे , संचालन व आभार प्रदर्शन वैभव बारसागडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता सुभाष कावळे अध्यक्ष-तळोधी युवा नाभिक बहुउद्देशिय संस्था तळोधी (बा), दिलीप बारसागडे अध्यक्ष-नाभिक युवा आघाडी तळोधी (बा), कैलास भा. बारसागडे, मिनाजी बारसागडे, प्रज्वल बारसागडे, होमराज सुर्यवंशी गिरगाव, सुधाकर खडसिंगे कन्हाळाव व सर्व नाभिक समाजबांधव यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या