सी.सी.टी.व्ही,सुरक्षागार्ड,स्वच्छता कर्मचारी,शौचालयात पाणी नाही . लघुशंकेनंतर हात धुण्याची व्यवस्था नाही .
गरीबाची लाल परी म्हणून प्रवास करणारी एस. टी. झाली अविश्वासाची.
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील फेमस गाव असलेल्या
हाळीत कांही महिण्यापुर्वीच २ कोटी रुपये खर्च करून बसस्थानक परिसरात काॅंक्रिटीकरण केले आहे .मात्र या इमारतीत प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. यामुळे हे काम २ कोटी ऐवजी कांही लाखातच गुंडाळल्याचा सुर कानी पडतो.येथे स्वच्छता व सुरक्षा कर्मचारी नाही.शौचालयात पाणी नाही.म्हणुन मैदानातच हाळीतील कांहीजण डे-नाईट शौचास बसतात.म्हणुन दुर्घंधी सुटली आहे. तसेच आॅगस्ट मध्ये सर्व्हे होऊनही सी सी. टीव्ही कॅमेरे नाहीत.लोकांना पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था नाही. हाळीचे बसस्थानक टवाळखोर मुलांचा व दारुड्यांचा अड्डा बनला आहे.त्यामुळे शाळा,काॅलेजसाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थीनींना व महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होतं आहे.असे बोलले जाते. व याची कल्पना देऊनही लातुरचे डी.एम. स्थानिक कर्मचारी बदलण्याबाबत व येथील समस्या सोडविण्याबाबत कांहीच कारवाही करताना दिसेनात. त्यामुळे हाळीचे बस स्थानक गैरसोईचे व दारुड्यांचे माहेरघर झाले आहे. यामुळे प्रवाशांमध्ये बहूजण हिताय,बहूजण दु:खाय..
असा संतप्त सुर निघत आहे.
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकातील झालेल्या बलात्कार प्रकरणी महाराष्ट्रातील सर्वच बसस्थानकांची सुरक्षा यंत्रणा ऐरणीवर आली आहे .चार,पाच दिवस केवळ प्रत्येक बसस्थानकात सी.सी.टीव्ही सह अनेक सुविधा पूरविण्याच्या गप्पा झाल्या.म.रा.मा.प.विभागातील कांही अधिकारी निलंबित झाले.तरीही येथे आजवर एकही सेवा उपलब्ध झाली नाही. सुरक्षा यंञणेचा पुर्णत: बोजवाराच उडाल्याचे दिसते.तरीही वरिष्ठांचे डोळे उघडेनात.एखादी दुर्देवी घटना घडायची वाट वरिष्ठ बघत तर नाहीत ना?तसेच येथे कार्यरत असलेला कर्मचारी जोपर्यंत बदलत नाहीत,तोपर्यंत या बसस्थानकाचे व प्रवाशांचे कल्याण होऊच शकत नाही. अशी चर्चा दबक्या आवाजात हाळीतील एसटीचे कांही वाहक-चालक जयप्रकाश च्या बाकड्यावर बसून करत होते.


0 टिप्पण्या